कांदा दरात अल्पशी वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 09:19 PM2020-02-29T21:19:12+5:302020-02-29T21:19:46+5:30

येवला : येथील बाजार आवारात कांद्याची आवक टिकून आहे. दररोज ८०० ट्रॅक्टरमधून सुमारे १५ ते १६ हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी येत आहे.

A slight increase in onion rates | कांदा दरात अल्पशी वाढ

कांदा दरात अल्पशी वाढ

Next
ठळक मुद्देयेवला बाजार समितीत आवक टिकून । शेतकऱ्यांना दरवाढीची आशा

लोकमत न्यूज नेटवर्क
येवला : येथील बाजार आवारात कांद्याची आवक टिकून आहे. दररोज ८०० ट्रॅक्टरमधून सुमारे १५ ते १६ हजार क्विंटल कांदा विक्रीसाठी येत आहे.
निर्यातबंदी उठविल्याचे ग्राहक संरक्षणमंत्री रामविलास पासवान यांनी जाहीर केले. प्रत्यक्षात आदेश नसले तरी दर थोडेफार वाढले आहेत. गेल्या दोन दिवसांत ३०० रुपये प्रतिक्विंटल दराने वाढ झाली असली तरी हे दर किती दिवस टिकतील याबाबत शेतकऱ्यांत चर्चा सुरू आहे. दोन दिवसांपासून २३०० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत आहे, मात्र दर चढउताराचे गणित निर्यात धोरणावर अवलंबून आहे. निर्यात धोरणाबाबत संदिग्धता नको असे शेतकºयांचे म्हणणे आहे. किमान ३ हजार रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला तर शेतकरी थेट कांदा मार्केटला आणेल. कांदा चाळीत साठविण्याचे प्रमाण कमी होईल. उत्पन्नाच्या ५० टक्के उन्हाळ कांदा चाळीत साठविला जाण्याचे गणित आजही शेतकरी करीत आहे. उर्वरित ५० टक्के कांद्याला किमान २५०० ते ३ हजार दर मिळाला, तर शेतकरी थेट मार्केटला येतो. हे चित्र आजही आहे. उशिरा अर्थात जानेवारीतील कांदा एप्रिलमध्ये काढणीसाठी येईल. एप्रिलमध्ये समाधानकारक दर मिळाला नाही तर हा कांदा मोठ्या प्रमाणावर चाळीत साठविला जाईल, अशी शक्यता आहे. आगामी खरिपातील पोळ कांद्याच्या चाळीत साठविलेल्या उन्हाळ कांद्याचे दर अवलंबून आहे. यंदा कांद्याचे पीक सर्वत्र चांगले असल्याने मोठ्या प्रमाणावर लाल कांदा आहे. मागणी आणि पुरवठा हे गणित यंदा बिघडणार नाही, असे जाणकारांचे मत आहे.दर वाढण्याची शक्यता कमी
कांद्याला आलेल्या खर्चाची तोंडमिळवणी करण्यासाठी किमान रांगडा कांद्याचे दोन पैसे हातात मिळत असल्याने घाईने शेतकरी कांदा मार्केटला आणत आहे. सध्या मार्केटला या कांद्याची आवक सुरू आहे. निर्यात खुली झाली तरी कांद्याचे दर फार वाढणार नसल्याचा अंदाज व्यापाºयांनी व्यक्त केला आहे. रांगडा कांद्यासाठी सध्याचे हवामान खराब आहे. त्यामुळे औषधांचा खर्च वाढला आहे. निर्यात खुली होणार या भरवशावर दोन पैसे अधिक मिळतील, अशी अपेक्षा होती; मात्र फारसे आशादायी चित्र दिसत नाही.
- किरण नागरे, शेतकरी

Web Title: A slight increase in onion rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.