‘हम सब एक है’ चा नारा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 01:06 AM2019-12-20T01:06:54+5:302019-12-20T01:07:20+5:30
केंद्र शासनाने केलेल्या राष्टÑीय नागरिकता नोंदणी व नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी डाव्या संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या संविधान बचाव रॅलीत सहभागी हजारो नागरिकांनी ‘हम सब एक है’ असा नारा दिला. नागरिकत्व दुरुस्ती कायदा संविधानविरोधी असल्याचा आरोप करीत सदर कायदा रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
नाशिक : केंद्र शासनाने केलेल्या राष्टÑीय नागरिकता नोंदणी व नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध करण्यासाठी डाव्या संघटनांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या संविधान बचाव रॅलीत सहभागी हजारो नागरिकांनी ‘हम सब एक है’ असा नारा दिला. नागरिकत्व दुरुस्ती कायदा संविधानविरोधी असल्याचा आरोप करीत सदर कायदा रद्द करण्याची जोरदार मागणी करण्यात आली.
केंद्र शासनाने राष्टÑीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) व नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएबी) मंजूर केल्याच्या निषेधार्थ शहरात डाव्या पक्षांच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीस मुस्लीम समाजाच्या विविध संघटनांनी पाठिंबा दर्शवित रॅलीत सहभाग घेतला. गोल्फ क्लब मैदान येथून रॅलीस प्रारंभ करण्यात आला. त्र्यंबकरोड सिग्नलमार्गे, जिल्हा परिषद, जीपीओरोड, गंजमाळ सिग्नलमार्गे रॅली शिवाजीरोडवरील डॉ. आंबेडकर पुतळ्यापर्यंत आली. रॅलीत सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या तीव्र विरोधात घोषणाबाजी करीत ‘भारत माता की जय’ तसेच ‘देश बचावा’च्या घोषणा दिल्या. ‘हिंद-मुस्लीम एक आहे’, देश तोडण्याचा कायदा रद्द करा, भारत मेरा देश है, भारत के सन्मान मे हम उतरे मैदान में, असे फलक रॅलीत झळकविण्यात आले.
विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग
मोर्चा रॅलीमध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी आणि विद्यार्थिंनीचा लक्षणीय सहभाग होता. एनआरसी, सीएबी, नको तर नोकऱ्या द्या, देशात फूट पाडू नका, भेदाभेदपासून हवी आझादी, अशा घोषणा देत तरुणांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला तीव्र विरोध दर्शविला. विद्यार्थिनींनीदेखील राष्ट्रीय एकात्मता आणि भारतमातेच्या घोषणा देत देशात फूट पाडणारा कायदा रद्द करण्याच्या तीव्र घोषणा दिल्या. यावेळी तरुणांनी तिरंगा ध्वज फडकावित राष्ट्रीय एकात्मता, तसेच भारतीय संविधान वाचविण्यासाठी तरुण रस्त्यावर उतरत घोषणा दिल्या. महाविद्यालयीन तरुण-तरुणींसह महिला वर्गाचाही सहभाग मोठ्या प्रमाणात होता.