नाशिकरोड रेल्वेस्थानकावर बसविलेल्या सरकत्या जिन्याचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2018 12:26 AM2018-07-22T00:26:10+5:302018-07-22T00:26:31+5:30
नाशिकरोड रेल्वेस्थानकावर बसविण्यात आलेल्या सरकते जिन्याचा (एस्केलेटर) लोकार्पण सोहळा खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. सरकत्या जिन्यामुळे वयोवृद्ध, अपंग, गरोदर महिला आदींची गैरसोय दूर झाली आहे.
नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वेस्थानकावर बसविण्यात आलेल्या सरकते जिन्याचा (एस्केलेटर) लोकार्पण सोहळा खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते उत्साहात पार पडला. सरकत्या जिन्यामुळे वयोवृद्ध, अपंग, गरोदर महिला आदींची गैरसोय दूर झाली आहे. नाशिकरोड रेल्वेस्थानकावरील प्रवाशांची वाढती गर्दी व गरज लक्षात घेऊन प्लॅटफॉर्म क्रमांक १ येथून पादचारी पुलावर जाण्यासाठी सरकत्या जिन्याला गेल्यावर्षी मंजुरी देण्यात आली होती. शनिवारी सकाळी खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते फित कापून सरकत्या जिन्याचे उद्घाटन करण्यात आले. सरकत्या जिन्यामुळे प्रवाशांना प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून दोन-तीनवर चढणे व उतरणे सोपे झाले आहे. यावेळी रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य राजेश फोकणे, नितीन चिडे, नाशिकरोड रेल्वे स्टेशन प्रंबधक आर. के. कुठार, वाणिज्य निरीक्षक मधुकर गोसावी, अभियंता प्रवीण पाटील, फारूक सय्यद, जुबेर पठाण, संजय गांगुर्डे, महेंद्र पगार, कैलास मांलुजकर, अजयकुमार सनोरिया, पी. एच. वाघ, अन्वर शेख, एस. प्रकाश, के. जी. गुप्ता आदी उपस्थित होते.