‘स्पीड’पोस्टची गती मंदावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2020 11:31 PM2020-07-24T23:31:10+5:302020-07-25T01:13:48+5:30

सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी अद्यापही प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली नसल्याने रेल्वे गाड्या आणि बसेस बंद आहेत. त्याचा फटका टपाल खात्यालादेखील बसत असून, बसेस आणि रेल्वेच्या माध्यमातून होणाऱ्या टपाल वाहतुकीला ब्रेक लागला आहे. विशेषत: स्पीडपोस्ट वितरणाची गती मंदावली असून, आठ ते दहा दिवसांच्या विलंबाने टपाल पोहोचत आहे.

Slow down the 'speed' post | ‘स्पीड’पोस्टची गती मंदावली

‘स्पीड’पोस्टची गती मंदावली

Next
ठळक मुद्देवाहतूक निर्बंधाचा फटका : बसेस, रेल्वे बंदमुळे टपालास विलंब

नाशिक : सध्या अनलॉकची प्रक्रिया सुरू असली तरी अद्यापही प्रवासी वाहतुकीला परवानगी देण्यात आलेली नसल्याने रेल्वे गाड्या आणि बसेस बंद आहेत. त्याचा फटका टपाल खात्यालादेखील बसत असून, बसेस आणि रेल्वेच्या माध्यमातून होणाऱ्या टपाल वाहतुकीला ब्रेक लागला आहे. विशेषत: स्पीडपोस्ट वितरणाची गती मंदावली असून, आठ ते दहा दिवसांच्या विलंबाने टपाल पोहोचत आहे.
अनलॉकच्या प्रक्रियेनंतर अनेक उद्योग, व्यवसाय सुरू झाले आहे. अनेक आस्थापनांवरील कर्मचाऱ्यांची संख्यादेखील वाढविण्यात आली आहे. टपाल कार्यालयातदेखील पूर्ण
क्षमतेने कर्मचारी कामकाज करीत असून, टपाल खात्याच्या सर्व सेवा सुरुळीत आहेत. परंतु रेल्वे आणि बसेसच्या माध्यमातून होणारी टपालाची वाहतूक खोळंबल्यामुळे बटवड्यावर त्याचा परिणाम झाल्याचे दिसून येते. टपाल विभागाचे कामकाज सुरू असल्याने नियमित टपाल, स्पीड पोस्ट तसेच रजिस्टर्स टपाल पेटीत टाकले जात आहेत. एका शहरातून दुसºया शहरात तत्काळ टपाल पोहचावे म्हणून नागरिक स्पीड पोस्ट योजनेच्या माध्यमातून टपाल पाठविण्याला प्राधान्य देतात. परंतु वाहतुकीवरील निर्बंधामुळे स्पीड पोस्टची गती मंदावली असल्याचे सूत्रांनी सांगितले.
मुंबई, पुणे तसेच अन्य शहरांतून नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात स्पीड पोस्ट येते. नाशिक जिल्ह्यातूनही अन्य जिल्ह्यांमध्ये पाठविण्यात येणारे टपाल रेल्वे तसेच बसेसच्या माध्यमातून पाठविले जाते. परंतु दळणवळणाच्या या साधनांवर निर्बंध असल्याने त्याचा परिणाम टपाल खात्याच्या व्यवस्थेवरही जाणवू लागला आहे. टपाल खात्याच्या लालरंगाच्या ‘मेल’ वाहनातून सध्या टपालांची वाहतूक केली जात असल्याने टपाल पोहोचवण्यास विलंब होत आहे. मुंबईहून धुळे, जळगाव असा प्रवास ‘मेल’ वाहनातून सध्या सुरू आहे. नाशिक जिल्हांतर्गत टपालासाठीदेखील नाशिक पोस्ट कार्यालयाला ‘मेल’ वाहन वापरावे लागत आहे. या प्रक्रियेमुळे साहजिकच टपाल वितरणाच्या कामावर परिणाम झाला असून, वाहतूक व्यवस्थेला विलंब होऊ लागला आहे.
तक्रार कमी : टपालाच्या अन्य सेवा मात्र सुरळीत
नेहमीपेक्षा टपालाची संख्या कमी झालेली असली तरी काही प्रमाणात असलेल्या टपालालादेखील विलंब होत आहे. वाहतुकीवरील निर्बंध आणि त्यामुळे आलेल्या मर्यादेची नागरिकांना जाणीव असल्याने नागरिकांकडून तक्रार होत नसल्याचा दावा टपाल विभागाच्या अधिकाºयांनी केला आहे.
४लॉकडाऊनच्या काळात नाशिक विभागातील ग्राहकांना पोस्ट बॅँकेची सुविधा देणाºया टपाल खात्याने नियमित टपाल बटवडादेखील सुरू ठेवला आहे. दळणवळणाच्या मर्यादा अल्या असल्या तरी पोस्टाच्या गाडीने तसेच पोस्टमनच्या मदतीने जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे संबंधितांनी सांगितले.

Web Title: Slow down the 'speed' post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.