सोयगाव आरोग्य केंद्रावर लसीकरण धिम्या गतीने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:11 AM2021-06-28T04:11:08+5:302021-06-28T04:11:08+5:30
नागरिकांनी लसीकरण केल्यास कोरोनाचा पुढील उद्रेक काही प्रमाणात कमी होऊ शकतो. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरणासाठी ...
नागरिकांनी लसीकरण केल्यास कोरोनाचा पुढील उद्रेक काही प्रमाणात कमी होऊ शकतो. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरणासाठी प्रोत्साहन देऊन, सर्वांना लसीकरणाचा लाभ मिळण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. लसीकरणासंबंधात समज गैरसमज दूर करण्यासाठी मोहीम राबवून, नागरी आरोग्य सुरक्षिततेसाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. ४५ वर्षावरील जवळपास फक्त आठ हजार जणांचे लसीकरण झाले. प्रभागातील नगरसेवकांनी वार्डनिहाय पाहणी करून लसीकरण झालेले अथवा बाकी असलेल्या नागरिक संख्या निश्चित करून सर्वांना लसीकरण कसे देता येईल याकडे लक्ष केंद्रित केले पाहिजे.
कोरोना पाठोपाठ डेल्टा संक्रमणाचा धोका उद्भवत असून नागरी आरोग्य अधिक धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे प्रशासनाने जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.