फटाके विक्रेत्यावर मंदीचे सावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2018 03:55 PM2018-11-07T15:55:50+5:302018-11-07T15:58:36+5:30
चांदवड (महेश गुजराथी) - चांदवड येथील फटाके विक्रेत्यांवर मंदीचे सावट आल्याने लाखो रुपयाचा फटका या विक्रेत्यांना बसण्याची शक्यता आहे.
चांदवड (महेश गुजराथी) - चांदवड येथील फटाके विक्रेत्यांवर मंदीचे सावट
आल्याने लाखो रुपयाचा फटका या विक्रेत्यांना बसण्याची शक्यता आहे. प्रशासनाने गेल्याच वर्षी जिल्हाधिकारी यांनी वर्षानुवर्षे नकाशा प्रमाणे ठरवुन दिलेल्या जागा उपलब्ध न करुन दिल्याने फटाके विक्रेत्यांना या जागेवर बसु न दिल्याने यंदाच्या वर्षी फटाके विक्रेत्यांना मोठा फटका बसल्याचे बोलले जात असून तर शासनाने नियमानुसार सुमारे १९ ते २० दुकानदारानी फटाके विक्रीचा तात्पुरता परवाना काढण्याचे दरवर्षी प्रमाणे कागदपत्रे दाखल केली आहेत.तर प्रशासनाने गेल्याच वर्षी आठवडे बाजारातील वर्षानुवर्षापासूनची परपंरागत जागा बदल्याने फटाके विक्रीचा व्यवसाय पाहिजे तसा होत नाही त्यामुळे लाखो रुपयाचा माल पडून राहण्याची चिन्ह दिसून येत आहे. त्यात यंदाच्या वर्षी दुष्काळी परिस्थिती, नोटबंदी , जीएसटी. व फटाक्यावरील बंदी शासनाने घातल्याने या फटाके विक्रेत्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसत आहे. त्यातच विविध शाळामधुन प्रदुर्षण व आवाजविरहित फटाके यांची शपथ हेही या फटाके विक्रीवर मंदीचे सावट दिसून आल्याने अनेक व्यापाऱ्यानी कर्जाने पैसे काढून फटाके विक्री साठी माल भरला मात्र तो अंगावर पडून राहण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान नगरपलिका प्रशासनाने फटाके विक्रेत्याकडून मोठ्या प्रमाणात कर वसुल करुन ही त्यांना पाहिजे ती जागा न देता त्यांच्या पुढे सोमवारी आठवडेबाजारातील अनेक विक्रेत्यांनी फटाके विक्रेत्यांच्या पुढे इतर दुकानदारांना बसू दिल्याने त्यांनाही फटका बसला असल्याचे बोलले जात आहे. तर अतिक्रमण धारक हे विना परवाना वर्षभर या जागेवर बसत असून अवघ्या आठ दिवसाकरिता फटाके विक्रेते जागा मागतात त्यांना जागा न देता प्रशासनाने कर घेऊनही लक्ष न दिल्याने या फटाके विक्रेत्यांचा माल अंगावर पडून राहिला याबाबत विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर फटाके विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात परवाना खर्च ,इतर मंडप खर्च, लाईट खर्च करुन या मंदीमुळे त्यांना मोठ्या प्रमाणात फटका बसल्याने अधिकच नाराजी व्यक्त केली त्यात सर्वत्र मंदीचे सावट होते नवरात्र उत्सवातही मंदीमुळे अनेक व्यापाºयांनी नाराजी व्यक्त केली होती. व आता दिवाळीतही फटाके विक्रेत्यावर संक्रात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.यंदाच्या वर्षी दिवाळी सणावर दुष्काळी सावट आल्याने सर्वच व्यावसाईकांवर मंदीचा फटका बसल्याचे चित्र बाजारात दिसून येत आहे.चांदवड येथील आठवडेबाजारात शिराई, पणती,लाह्या बत्तासे,झेंडूंची फुले, व आकाश कंदील यांची विविध दुकाने थाटली होती मात्र सर्वत्र मंदीचे चित्र दिसून आले.