परसुल धरणातून लोकसहभागातुन गाळ उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2019 10:34 PM2019-05-09T22:34:24+5:302019-05-09T23:25:18+5:30

उमराणे : येथील परसुल धरणातील पाणी आटल्याने युवा मित्र फाऊंडेशन व लोकसहभागातुन गाळ उपसा करण्यास सुरु वात झाली आहे. गाळ मोफत भरु न दिला जात असल्याने गाळ वाहुन नेण्यास शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे.

The slurry of the people from the Parsul dam causes the pile | परसुल धरणातून लोकसहभागातुन गाळ उपसा

परसुल धरणातून लोकसहभागातुन गाळ उपसा

googlenewsNext
ठळक मुद्देउमराणे : शेतीसाठी उपयुक्त असल्याने शेतकऱ्यांनी केली गर्दी; पाणी साठवण क्षमता वाढणार

उमराणे : येथील परसुल धरणातील पाणी आटल्याने युवा मित्र फाऊंडेशन व लोकसहभागातुन गाळ उपसा करण्यास सुरु वात झाली आहे. गाळ मोफत भरु न दिला जात असल्याने गाळ वाहुन नेण्यास शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली आहे.
उमराणे येथे सन १८८५ साली ब्रिटिशकालीन परसुल धरण बांधण्यात आले आहे. १३४ वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या धरणात ७० चौरस कि.मी. पाणलोट क्षेत्रातुन दरवर्षी वाहुन येणाºया पाण्याबरोबर हजारो घनमिटर गाळ वाहुन आला आहे. परिणामी या गाळामुळे ११८ द.ल.घ.फुट पाणी साठवण क्षमता असलेल्या या धरणाची पाणी साठवण क्षमता अवघ्या ५८ द.ल.घ.फुटावर आली आहे. क्षमता कमी झाल्याने चालुवर्षी उमराणेसह परिसरातील गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या धरणातील गाळ पुर्णपणे काढण्यात यावा यासाठी लोकप्रतिनिधींसह शासनानेकडे वारंवार मागणी केली आहे. असे असताना गाळ भरुन देण्यासाठी युवा मित्र फाऊंडेशकडुन एक पोकलॅड मशिन उपलब्ध करुन देण्यात आले आहे.
शेतीसाठी उपयुक्त गाळ असल्याने परिसरातील शेतकºयांनी गाळ वाहुन नेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे. गाळ उपसा शुभारंभ येथील शेतकरी बाळासाहेब देवराम देवरे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जाणता राजा मंडळाचे अध्यक्ष नंदन देवरे, रामेश्वर गो शाळेचे संचालक सुनील देवरे, हेमंत देवरे, दिपक देवरे, साहेबराव देवरे, रतन मोरे आदींसह बहुतांश शेतकरी बांधव उपस्थित होते.
प्रशासनाकडुन शेतात गाळ टाकण्यासाठी धरणातील गाळ उपसा करण्यास परवानगी असुन शेती सुपिक होण्यासाठी परिसरातील शेतकºयांनी जास्तीत जास्त प्रमाणात गाळ उपसा करावा.
- व्ही. जी. पाटील, मंडल अधिकारी, उमराणे.
बºयाच वर्षांपूर्वीचा गाळ साचला असल्याने हा गाळ शेतीसाठी अत्यंत उपयुक्त आहे. परंतु सद्यस्थितीत गाळ भरुन देण्यासाठी एकच मशीन असल्याने ट्रॅक्टर भरणाºयांची गर्दी होत आहे. प्रशासनाने अजून एक, दोन मशिन उपलब्ध करून द्यावे.
- शरद देवरे, शेतकरी
(फोटो ०९ परसुल डॅम)

Web Title: The slurry of the people from the Parsul dam causes the pile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Damधरण