वडाळी नदीवरील छोटा पूल ठरतोय अडचणीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 09:50 PM2020-07-23T21:50:12+5:302020-07-24T00:24:22+5:30

निफाड येथील वडाळी नदीवरील जुन्या पुलाच्या जागी नवीन उंच पूल बांधावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सदर जुना छोटा पूल वडाळी नदीवर असून, या पुलावरून रानवड, नांदुर्डी या गावाकडे जाणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते. शिवाय निफाड येथील शेतकऱ्यांच्या जमिनी नांदुर्डी रोड भागात आहेत.

A small bridge over the Wadali river is becoming a problem | वडाळी नदीवरील छोटा पूल ठरतोय अडचणीचा

वडाळी नदीवरील छोटा पूल ठरतोय अडचणीचा

Next

निफाड येथील वडाळी नदीवरील जुन्या पुलाच्या जागी नवीन उंच पूल बांधावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. सदर जुना छोटा पूल वडाळी नदीवर असून, या पुलावरून रानवड, नांदुर्डी या गावाकडे जाणाऱ्या नागरिकांची वर्दळ असते. शिवाय निफाड येथील शेतकऱ्यांच्या जमिनी नांदुर्डी रोड भागात आहेत. सदर शेतकºयाची ये-जा या पुलावरून होत असते पूर्वी जेव्हा रानवड साखर कारखाना चालू होता तेव्हा याच पुलावरून उसाच्या ट्रक, बैलगाड्या यांची ये-जा मोठ्या संख्येने रानवड येथे चालू असायची. कारण याच पुलावरून निफाड येथून रानवडला जायला जवळचा मार्ग आहे. वडाळी नदीच्या पलीकडे नांदुर्डी रोड भागात राहणाºया शेतकºयांची मुले शाळेसाठी निफाड शहरात याच पुलावरून ये-जा करीत असतात. मात्र पावसाळ्यात विद्यार्थ्यांना या जुन्या पुलावरून प्रवास करणे जोखमीचे ठरते. मात्र या पुलाला मोठे खड्डे पडल्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढली आहे. शिवाय या पुलाच्या खाली नदीचे पाणी वाहून जाण्यासाठी असलेल्या मोºयांमध्ये गाळ साचलेला आहे. या नदीला साधारण पूर आल्यास मोºया तुंबून सदर पुराचे पाणी पुलावरून वाहत असल्याने रस्ता बंद होतो. त्यामुळे या पुलावरची वाहतूक बंद होते. वडाळी नदीपलीकडे राहणाºया शेतकºयांना निफाड शहरात येणे अवघड होऊन जाते. जर महापूर आला तर हा पूल पुरामुळे दिसेनासा होतो. त्यामुळे तात्पुरती गरज म्हणून सध्या हा पूल ये - जा करण्यासाठी उपयोगाचा आहे मात्र पूर आल्यानंतर या पुलावरील वाहतूक ठप्प होते. त्यामुळे याच पुलाच्या ठिकाणी मोठा आणि उंच पूल बांधल्यास नागरिकांची कायमस्वरूपी सोय होईल. तसेच पुराच्या काळातही या नवीन पुलावरून वाहतूक चालू राहील व जनजीवन ठप्प होणार नाही. त्यामुळे मोठ्या पुलाची मागणी जोर धरू लागली आहे.

Web Title: A small bridge over the Wadali river is becoming a problem

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक