बचतगटांना मिळणार मिनी मंत्रालयाचे ‘खुले आकाश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 01:29 AM2017-10-07T01:29:17+5:302017-10-07T01:29:27+5:30

जिल्ह्यातील महिला बचतगटांना त्यांनी दिवाळी सणासाठी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंच्या विक्रीसाठी थेट जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील आवार काही दिवसांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती दीपककुमार मीणा यांनी दिली.

Small groups will get 'open sky' | बचतगटांना मिळणार मिनी मंत्रालयाचे ‘खुले आकाश’

बचतगटांना मिळणार मिनी मंत्रालयाचे ‘खुले आकाश’

Next

नाशिक : जिल्ह्यातील महिला बचतगटांना त्यांनी दिवाळी सणासाठी उत्पादित केलेल्या विविध वस्तूंच्या विक्रीसाठी थेट जिल्हा परिषदेच्या मुख्यालयातील आवार काही दिवसांसाठी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती दीपककुमार मीणा यांनी दिली. हा प्रयोग यशस्वी झाल्यास जिल्हाभरातील पंचायत समित्यांचे आवार सुटीच्या दिवशी महिला बचतगटांना देण्याचा प्रयोग नाशिक जिल्हा परिषदेमार्फत राबविला जाणार आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी सांगितले की, महिला बचतगटांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी तसेच पाठबळ देऊन आर्थिकदृष्ट्या मदत करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या वतीने विविध प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यातच महिला बचतगटांना सणा-सुदीच्या काळात त्यांनी उत्पादित केलेल्या मालाला चांगली मागणी असते. मात्र ते विक्रीसाठी मोक्याची जागा किंवा शहरात मध्यवस्तीत जागा मिळत नाही. जागा मिळालीच तर जागेचे दर अव्वाच्या सव्वा असतात. त्यातच एवढे करूनही उत्पादित मालाची शंभर टक्के विक्री झाली, तरच महिला बचतगटांना त्याचा थोडाफार नफा मिळतो.

Web Title: Small groups will get 'open sky'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.