छोट्या दुकानांचे मॉलमध्ये रूपांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2017 12:00 AM2017-09-28T00:00:48+5:302017-09-28T00:11:38+5:30

एकेकाळी पंधरा-वीस हजार लोकसंख्या असलेले सटाणा गाव वाढत्या शहरीकरणामुळे आज साठ-सत्तर हजार लोकसंख्येचे शहर झाले आहे. पूर्वी पेठ गल्लीत सर्व व्यापार चालत असे; मात्र आता बदलत्या परिस्थितीत घराच्या पुढच्या भागाचे गाळ्यात रूपांतर होऊन छोटे-मोठे उद्योग, व्यवसाय सुरू झाले.

 Small shops malls convert | छोट्या दुकानांचे मॉलमध्ये रूपांतर

छोट्या दुकानांचे मॉलमध्ये रूपांतर

Next

बाजारात चैतन्य
सटाणा : एकेकाळी पंधरा-वीस हजार लोकसंख्या असलेले सटाणा गाव वाढत्या शहरीकरणामुळे आज साठ-सत्तर हजार लोकसंख्येचे शहर झाले आहे. पूर्वी पेठ गल्लीत सर्व व्यापार चालत असे; मात्र आता बदलत्या परिस्थितीत घराच्या पुढच्या भागाचे गाळ्यात रूपांतर होऊन छोटे-मोठे उद्योग, व्यवसाय सुरू झाले.  बागलाण तालुक्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या सटाणा शहराच्या आजूबाजूला गिरणा, आरम, मोसम या प्रमुख नद्यांच्या पाण्याने समृद्ध झालेला हा परिसर आहे. त्यामुळे शेतकरीवर्गाच्या हातात चांगला पैसा खेळत आहे. शहरात कापड, सराफी, किराणा, बांधकाम, वैद्यकीय या क्षेत्रात शहराची भरभराट झाली आहे. महिला आधुनिक झाल्या आहे. छोट्या टपरीत असणारे किराणा दुकान आता मॉल या आधुनिक संस्कृतीत रूपांतरित झाले. त्यामुळे ग्राहक मॉलमध्ये चोखंदळपणे किराणा माल खरेदी करताना दिसून येतात. शहरात किराणा व्यवसाय तेजीत असून, एकेकाळचे भिका गणपत किराणा दुकानाने मॉलमध्ये प्रवेश करून नावलौकिक मिळविला आहे. महिलावर्गाचा हा मोठा विक पॉइंट ओळखून शहरातील कापड व्यावसायिकांनी साडीची दालने उघडून महिलांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे पंधरा- वीस हजारांच्या पैठणीपासून शे-दोनशे रुपयांच्या साडी दुकानांची मोठी रेलचेल आहे. तरु णांमध्ये कपडे शिवून घेण्यापेक्षा जीन्स पॅण्ट, टी-शर्ट घेण्याकडे कल आहे. त्यामुळे सटाणा शहर तरुणवर्गाचे फॅशनेबल कपडे, साड्यांचे महत्त्वाचे केंद्र बनले आहे. या व्यवसायात दररोज पाच-दहा लाखांचा व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत. साडी इतकाच विक पॉइंट सोने हे होय. सोन्याचा मोह नाही अशी महिला शोधूनही सापडणार नाही. दोन सोन्याच्या मण्यांचे मंगळसूत्र असले पाहिजे ही अपेक्षा असणारी गरीब महिलाही समाजात आहेत आणि अंगभर सोन्याचे दागिने मिरविणाºया महिलाही आहेत. फार पूर्वीपासून सटाणा शहरातील सराफी व्यवसाय प्रसिद्ध आहे. श्रीमंतांना पैसा गुंतवणुकीसाठी सोने हा एकमेव पर्याय आहे. त्यामुळे साहजिकच सराफी व्यावसायिकांची उलाढाल मोठी आहे. वेगवेगळे नक्षीकाम असलेले व आधुनिक मशिनरीच्या साहाय्याने तयार केलेली सोन्याची आभूषणे विक्री करणारे अद्ययावत दालने सटाण्यात थाटली आहेत. सोनार गल्लीत दागिन्यांची मोठी दुकाने असून, लाखोंची उलाढाल होते.  एकंदरीत एकेकाळच्या शहर वजा खेडे असलेल्या सटाण्यात व्यापार, व्यवसायात मोठी भरभराट आहे. सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियेपासून वेगवेगळ्या आजारांवर उपचार करणारी धन्वंतरी या गावात आहे. त्यामुळे शहराचे स्वरूप बदलत असून, एक वैभवशाली शहर म्हणून सटाण्याचा अभिमानाने उल्लेख केला जाईल.
चार पिढ्यांपासून आमचा परिवार कापड विक्र ीच्या व्यवसायात आहे. आमचे आजोबा पूर्वी खेडोपाडी आठवडे बाजाराला जाऊन हा व्यवसाय करत. काबाड कष्ट, जिद्द, चिकाटीमुळे सटाण्यात घराबाहेरच दुकान टाकले. ग्राहकांचा प्रतिसाद आणि काळानुरूप ग्राहकांच्या गरजा ओळखल्यामुळे आज छोट्याशा दुकानाचे रूपांतर मॉलमध्ये झाले.
-अनिल बागुल,  कापड विक्रिते
आपले हक्काचे घर असावे असे प्रत्येकाला वाटते; मात्र शहरात एखादा प्लॉट घेऊन घर बांधणे सर्वसामान्य नागरिकाला न परवडणारे आहे. त्यासाठी आपण प्रथमच सटाणा शहरात फ्लॅट सिस्टीम आणली. चांगल्या सोयी-सुविधांमुळे त्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सिस्टीममुळे शहराच्या सौंदर्यातदेखील भर पडली आहे.  - दीपक सोनवणे,  बिल्डर
शहरातील ग्राहकांची पसंती ओळखून सोन्या-चांदीचे दागिने तयार करण्याबरोबरच दालनदेखील त्या तोडीचे असले पाहिजे म्हणून शोरूम तयार केले आहे. काळानुसार बदल केल्यामुळे नक्कीच व्यवसायात झळाळी आली असून, त्याला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.  -दिनेश घोडके,  सराफ व्यावसायिक
माझे आजोबा भिका गणपत शेठ यांनी किराणा दुकान टाकून व्यवसायाला सुरु वात केली. तिसरी पिढी हा व्यवसाय यशस्वीपणे पुढे नेत असताना मालात गुणवत्ता राखून एकाच दालनात वस्तू मिळाव्यात या हेतून छोट्याशा दुकानाचे आता मॉलमध्ये रूपांतर झाले आहे. त्याला ग्राहकांकडून प्रतिसाद मिळत आहे. -स्वप्नील येवला,  किराणा व्यावसायिक

Web Title:  Small shops malls convert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.