‘स्मार्ट सिटी’लाही जाहिरातींचे ग्रहण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2019 12:41 AM2019-04-09T00:41:10+5:302019-04-09T00:41:33+5:30

शहरातील विविध बसस्थानकांसह मध्यवर्ती बसस्थानक , महापालिका कार्यालय व अन्य शासकीय इमारतींच्या संरक्षक भिंतींवर अनधिकृतरीत्या जाहिरातबाजी करीत चिटकविण्यात येणाऱ्या पत्रकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे.

 'Smart City' also receives advertising | ‘स्मार्ट सिटी’लाही जाहिरातींचे ग्रहण

‘स्मार्ट सिटी’लाही जाहिरातींचे ग्रहण

Next

नाशिक : शहरातील विविध बसस्थानकांसह मध्यवर्ती बसस्थानक , महापालिका कार्यालय व अन्य शासकीय इमारतींच्या संरक्षक भिंतींवर अनधिकृतरीत्या जाहिरातबाजी करीत चिटकविण्यात येणाऱ्या पत्रकांमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. असे अनधिकृत जाहिरातींची पत्रके चिटकवून शहर विद्रुप करणाऱ्यांची वक्रदृष्टी स्मार्ट सिटीवरही पडली असून, स्मार्ट सिटीच्या कामांनाही अशी पत्रके चिटकली जाऊ लागल्याने हे प्रकल्प उभे राहण्यापूर्वीच त्यांना अनधिकृत जाहिरातीमुळे होणाºया विद्रुपीकरणाचे ग्रहण लागले आहे.
भित्तिपत्रक चिटकून शहर विद्रुप करणाऱ्यांवर महापालिकेने लोकमतच्या वृत्ताची दखल घेत कारवाई करीत गुन्हे दाखल केले. परंतु. त्यानंतरही अशा जाहिराती चिटकविणाºयांना कठोर शासन होत नसल्याने शहरात भित्तिपत्रकांच्या माध्यमातून अनधिकृत जाहिरातबाजी करणाºया नतद्रष्टांना बळ मिळत आहे. त्यातूनच सीबीएस ते अशोकस्तंभ भागात स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या स्मार्टरोडवरील बसस्थानकालाही अशाप्रकारे पत्रके चिटकवून विद्रुप करण्यात येत  आहे.
विशेष म्हणजे, महापालिकेच्या प्रवेशद्वाराजवळील संरक्षक भिंतीवर विविध जाहिरातींची पत्रके चिटकविण्याचे प्रकार सर्रास सुरू असताना आता या विकृतांची नजर स्मार्ट सिटीअंतर्गत सुरू असलेल्या कामांवर पडली आहे. त्यामुळे स्मार्ट सिटीलाही आता अनधिकृत जाहिरातींचे ग्रहण लागले आहे.
मानसिकता ‘स्मार्ट’ होणे आवश्यक
एकीकडे स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाºया नाशिक महानगरात ठिकठिकाणी जाहिराती, फलक भित्तिपत्रक ांची विद्रुपीकरण सुरू असताना दुसरीकडे जाहिरातींच्या माध्यमातून प्राप्त होणाºया महसुलात घट होऊन महापालिके च्या तिजोरीवरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनासह नाशिककरांनीही सजग होण्याची गरज आहे. स्मार्ट सिटीसोबत नागरिकांनीही स्मार्ट होत अशा विकृतींना पायबंद घालण्यासाठी भित्तिपत्रक चिटकविणाºयांविरोधात भूमिका घेण्याची गरज विविध सामाजिक संघटनांकडून व्यक्त होत आहे.

Web Title:  'Smart City' also receives advertising

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.