स्मार्ट सिटी अभियान : सायकल ट्रॅक, वायफाय सिस्टम, किआॅक्स, ई-टॉयलेट यांसह बरेच काही... अशोकस्तंभ ते त्र्यंबकनाका ‘स्मार्ट रोड’ ठरणार आकर्षण बिंदू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 01:09 AM2018-01-01T01:09:23+5:302018-01-01T01:10:07+5:30
नाशिक : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात दोन वर्षांपूर्वी नाशिकचा समावेश झाला आणि या अभियानांतर्गत राबविण्यात येणाºया विविध प्रकल्पांमध्ये सन २०१८ मध्ये अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका हा १.१ कि.मी.चा २४ मीटरचा मार्ग ‘स्मार्ट रोड’ म्हणून विकसित होणार आहे.
नाशिक : केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात दोन वर्षांपूर्वी नाशिकचा समावेश झाला आणि या अभियानांतर्गत राबविण्यात येणाºया विविध प्रकल्पांमध्ये सन २०१८ मध्ये अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका हा १.१ कि.मी.चा २४ मीटरचा मार्ग ‘स्मार्ट रोड’ म्हणून विकसित होणार आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे, वायफाय सिस्टमसह आकर्षक स्वरूपातील हा स्मार्ट रोड आठ ते दहा महिन्यांत साकारण्याची ग्वाही कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिली आहे. त्यामुळे नाशिककरांना या स्मार्ट रोडची नवीन वर्षात भेट मिळणार आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत रेट्रोफिटिंग या घटकात कंपनीने जुने नाशिक परिसराचा विकास करण्याचा संकल्प सोडला आहे. त्यातूनच स्मार्ट रोड साकारण्याची कल्पना पुढे आली. स्मार्ट सिटीच्या विविध प्रकल्पांचा आराखडा तयार करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या केपीएमजी संस्थेने प्रस्तावित रस्त्याचे अशोकस्तंभ ते मेहेर चौक लिंक, मेहेर ते सीबीएस चौक लिंक, सीबीएस चौक ते त्र्यंबक नाका लिंक अशा तीन टप्प्यांत तीन वेळा सर्वेक्षण केले. सदर रस्त्याचा प्रारूप आराखडा नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन सादर करण्यात आला.
प्रत्येकी १६ तासांच्या या सर्वेक्षणात अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका यादरम्यान अस्तित्वात असलेले सिग्नल, चौक, मार्गस्थ होणाºया वाहनांची संख्या, रिक्षा स्टॅण्ड, रस्त्यालगतच्या झाडांची संख्या आदींचाही विचार करण्यात आला. या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत व सुरक्षित करण्यासाठी तसेच रस्त्याचा वापर करणाºया प्रत्येक घटकाचा विचार करून, त्यांना काय सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, यासंबंधी यादी तयार करण्यात आली. त्यानुसार स्मार्ट रोडचे संकल्पचित्र तयार करण्यात आले आहे. या रस्त्यावरील अशोकस्तंभ, मेहेर, सीबीएस आणि त्र्यंबकनाका या चार जंक्शनचे आधुनिकीकरण केले जाणार असून, रस्त्यालगत सायकल ट्रॅक, माहिती व तंत्रज्ञानाशी
निगडीत किआॅक्स यंत्रणा, अत्याधुनिक इलेक्ट्रिक पोल आदी सुविधा साकारल्या जाणार आहेत. पायलट प्रोजेक्ट म्हणून हा प्रकल्प राबविला जाणार असून, त्याची यशस्विता लक्षात घेऊन शहरात महापालिकेच्या वतीने अन्यत्रही स्मार्ट रोडची कामे करण्यात येणार आहेत. सदर स्मार्ट रोड नाशिकचा आकर्षण बिंदू ठरणार आहे. तीन ठिकाणी एकेरी मार्ग स्मार्ट रोड साकारतानाच सीबीएस, एम.जी.रोडवरील वर्दळ कमी करण्यासाठी तीन एकेरी मार्ग सुचिवण्यात आले आहेत. त्या सीबीएस ते त्र्यंबक नाका, शालिमार ते सीबीएस, महाबळ चौक ते महात्मा गांधी रस्ता असे तीन रस्ते एकेरी केले जाणार आहेत. म्हणजेच शालिमारकडून सीबीएसकडे जाण्यासाठी शिवाजीरोडकडे न वळता सार्वजनिक वाचनालय, महाबळ चौक, महात्मा गांधी रस्ता व पुढे सीबीएसकडे जाता येईल. अशोकस्तंभ येथील वाहतूक कमी करण्यासाठी गंगापूररोडकडून रामवाडी पुलाकडे जाण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यासमोरील रस्त्याच्या वापराचा पर्याय देण्यात आला. भविष्यात रामवाडी पुलाला समांतर पूल बांधण्याचे सुचिवण्यात आले आहे.