स्मार्ट सिटी जोरात : ई-पार्किंगची चाचपणी, एलईडी पथदीपांचे कामही लवकरच शहरात १५ ठिकाणी सायकल शेअरिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2018 01:18 AM2018-04-06T01:18:35+5:302018-04-06T01:18:35+5:30
नाशिक : शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध कामांना गती देण्यात आली असून, बहुतांशी प्रकल्पांची अंतिम कार्यवाही चालू महिन्यातच होणार आहे.
नाशिक : शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध कामांना गती देण्यात आली असून, बहुतांशी प्रकल्पांची अंतिम कार्यवाही चालू महिन्यातच होणार आहे, तर पंधरा ठिकाणी सायकल शेअरिंगची व्यवस्था असूनही ते याच पंधरवड्यात सुरू होणार आहेत. स्मार्ट सिटीसाठी स्थापन कंपनीची बैठक बुधवारी (दि.४) पार पडली. यावेळी विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला. प्रदूषण कमी करण्यासाठी सायकल शेअरिंगचा प्रकल्प पीपीपीअंतर्गत महापालिका राबवित असून, शहराच्या कोणत्या कोणत्या भागात अशाप्रकारचे सायकल शेअरिंग करता येईल. त्याबाबत सर्व्हे सुरू आहेत. तथापि, पहिल्या टप्प्यात पंधरा जागा निश्चित करण्यात आल्या
असून, तेथे याच पंधरवड्यात सायकल सेवा बहुमजली वाहनतळे महिनाअखेरीस शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी बहुमजली वाहनतळे चालू महिन्याच्या अखेरीस सुरू करण्यात येणार आहेत. रविवार कारंजावरील यशवंत मंडई, तसेच महात्मा गांधीरोडवरील छत्रपती शिवाजी स्टेडियम, पंचवटीतील सीतागुंफा येथे ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. शहरात २७ ठिकाणी आॅन रोड, तर ५ आॅफ रोड ठिकाणी ई-पार्किंग सुरू करण्यात येणार असून त्यासाठी दोन कंपन्यांनी दावेदारी केली आहे. या कंपन्यांनी गुरुवारी (दि.५) महापालिकेच्या आवारात ई-पार्किंगचे प्रात्यक्षिक सादर केले.