नवरात्रात होणार स्मार्ट सिटीचा जागर

By admin | Published: October 6, 2016 01:25 AM2016-10-06T01:25:19+5:302016-10-06T01:32:50+5:30

राणेनगर येथील सार्वजनिक मित्रमंडळाचा उपक्रम

The smart city will be in Navratri | नवरात्रात होणार स्मार्ट सिटीचा जागर

नवरात्रात होणार स्मार्ट सिटीचा जागर

Next

 इंदिरानगर : नवरात्रोत्सवाचा ज्वर दिवसेंदिवस वाढू लागला असून, शहरात उत्साहाचे वातावरण बघायला मिळते आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इंदिरानगर येथील सह्याद्री युवक मित्रमंडळ आणि अष्टविनायक मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने राणेनगर मैदान येथे रास दांडियाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत
आहे.
दररोज उत्साहात दांडिया खेळला जात असतानाच मंडळातर्फे महिलांना ‘नवदुर्गा’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये कविता राऊत (क्रीडा), अपूर्वा जाखडी (अंतराळ क्षेत्र), सुनीता पाटील (सामाजिक कार्य), रजनी लिमये (शैक्षणिक कार्य), प्रतिभा आहेर (सायकलपटू), विद्या फडके यांच्यासह मनपा महिला सफाई कामगार, शासकीय रुग्णालयातील परिचारिका आणि परिवहन महामंडळात वाहक म्हणून कर्तव्य बजाविणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात येणार
आहे.
नाशिक शहराची स्मार्ट सिटीमध्ये निवड झाल्याने येथे येणाऱ्या भाविकांना शहराबद्दल वाटणाऱ्या सूचना देण्याबाबत आवाहन क रण्यात आले असून, यातील निवडक सूचनांना आकर्षक बक्षिसे देऊन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती अमोल जाधव आणि देवानंद बिरारी यांनी दिली. परिसरातील गणेश युवक मित्रमंडळ, बाजीराव फाउंडेशन, नवदुर्गा मित्रमंडळ, श्री साईराम सामाजिक बहुद्देशीय संस्था आदि सार्वजनिक मंडळांतर्फे पैठणी तसेच रोख स्वरूपातील बक्षिसांचे वितरण करण्यात येणार आहे. (वार्ताहर)

Web Title: The smart city will be in Navratri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.