३३ ठिकाणी स्मार्ट पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2018 01:53 AM2018-04-12T01:53:00+5:302018-04-12T01:53:00+5:30

नाशिक : शहरातील वाहनतळाची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत २८ ठिकाणी आॅन स्ट्रिट व पाच ठिकाणी आॅफ स्ट्रिट पार्किंगचे नियोजन केले आहे. महापालिकेत बुधवारी (दि. ११) नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत नाशिककरांसाठी महत्त्वाची समस्या बनलेल्या पार्किं गच्या प्रश्नावर निर्णय झाला असून, शहरातील विविध ठिकाणच्या पार्किंगचे नियोजनही यावेळी करण्यात आले.

Smart parking in 33 places | ३३ ठिकाणी स्मार्ट पार्किंग

३३ ठिकाणी स्मार्ट पार्किंग

Next
ठळक मुद्देस्मार्ट सिटीची बैठक : शिवाजी स्टेडिअमच्या जागेत भुयारी वाहनतळाचा विचार स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालकांचा अभ्यास सुरू

नाशिक : शहरातील वाहनतळाची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेने स्मार्ट सिटी योजनेंतर्गत २८ ठिकाणी आॅन स्ट्रिट व पाच ठिकाणी आॅफ स्ट्रिट पार्किंगचे नियोजन केले आहे. महापालिकेत बुधवारी (दि. ११) नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत नाशिककरांसाठी महत्त्वाची समस्या बनलेल्या पार्किं गच्या प्रश्नावर निर्णय झाला असून, शहरातील विविध ठिकाणच्या पार्किंगचे नियोजनही यावेळी करण्यात आले.
महापालिका क्षेत्रात वाहनतळाचा विषय गंभीर असून, या पार्श्वभूमीवर शहरातील पार्किंगची समस्या सोडविण्याच्या दृष्टीने स्मार्ट सिटी अंतर्गत नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शहरात ३३ ठिकाणी पार्किंग होणार आहे. यातील २८ ठिकाणच्या आॅन स्ट्रिट पार्किंगमध्ये रस्त्याच्या बाजूलाच वाहने पार्किंग करण्याची सुविधा करण्यात येणार आहे, तर आॅफ स्ट्रिट पार्किंगमध्ये निश्चित ठिकाणी पार्किंग करण्याची सुविधा करण्यात येणार आहे. आॅफ स्ट्रिट असलेली सर्व वाहनतळे अत्याधुनिक आणि स्वयंचलित यंत्रणांनी परिपूर्ण असणार आहे. शहर परिसरात उपलब्ध जागांवर आधारित पार्किंगसाठी बी. डी. भालेकर मैदानाच्या जागेवर ३०२ वाहनांसाठी भुयारी वाहनतळ उभारण्यात येणार असून, यशवंत मंडई येथे २१२ वाहनांसाठी पूर्णत: स्वयंचलित असे बहुमजली पार्किंग तयार करण्यात येणार आहे, तर सीतागुंफे जवळ पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपच्या माध्यमातून २५२ वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. शहरातील विविध ठिकाणच्या पार्किंग व्यवस्था उभारण्यासाठी व त्या नियंत्रित करण्यासाठी समाधानकारक प्रात्यक्षिके दाखविणाऱ्या इंस्पिरिया आणि ट्रिगिन या कंपन्या पात्र ठरल्याचेही स्मार्ट सिटीच्या बैठकीत समोर आले आहे.स्मार्ट सिटी तज्ज्ञ संचालकपदी भास्कर मुंढे संचालक मंडळ नियुक्तनाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड कंपनी संचालक मंडळाच्या बुधवारी (दि.११) झालेल्या सातव्या बैठकीत माजी सनदी अधिकारी भास्कर मुंढे यांची कंपनीच्या तज्ज्ञ संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. तर स्थायी समिती सभापती हिमगौरी आहेर, शाहू खैरे व गुरुमित बग्गा या महापालिका प्रतिनिधींची अतिरिक्त संचालकपदी नियुक्ती करण्यात आली. नाशिकसाठी काम करण्यास आवडेल : मुंढेउत्तर महाराष्टÑात तब्बल पंधरा वर्षे काम केल्याचा अनुभव असलेले माजी सनदी अधिकारी भास्कर मुंढे यांनी नाशिकसारख्या हवा, पाणी आणि सकारात्मक विचार तसेच रचनात्मक काम करण्यास पाठबळ देणाºया शहरासाठी काम करायला निश्चितच आवडेल, अशी भावना ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे. मुंढे यांची स्मार्ट सिटीचे संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. २००३-०४ मध्ये धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना त्यांनी राबविलेला नद्या जोड प्रकल्प राबविल्याने राज्यात त्यांची सकारात्मक प्रतिमा निर्माण झाली. तत्कालीन मुख्यमंत्री विलास देशमुख यांनी त्यांच्या कार्याचा गौरवही केला होता. अमरावती आणि औरंगाबाद विभागाचे आयुक्त म्हणून काम करणारे मुंढे यांनी नाशिकला आदिवासी विकास आयुक्त म्हणूनदेखील काम केले आहे. कामगार कल्याण सचिव म्हणून सेवानिवृत्त झाल्यानंतरही मुंढे यांना शासनाने मानव मिशनचे आयुक्त म्हणून जबाबदारी दिली. सध्या केंद्र सरकारच्या वतीने दिल्ली- मुंबई कोरीडोर प्रकल्प राबविण्यात येत असून त्यासाठी स्थापन एसपीव्ही कंपनीचेदेखील ते संचालक आहेत. स्मार्ट कामे अशीतीन महिन्यांत सायकल शेअरिंग
सार्वजनिक सायकल शेअरिंग योजनेअंतर्गत येत्या तीन महिन्यांत शहरातील विविध भागातील स्टॅण्डवर एक हजार सायकली उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
ंमहाआयटीसाठी ४५ कोटी
महाआयटीच्या माध्यमातून शहरात ३११५ सीसीटीव्ही बसविण्याचे नियोजन आहे. त्यासाठी स्मार्ट सिटी कंपनी ४५ कोटींचा वाटा शासनाला देणार आहे.
ंदोन बहुमजली पार्किंग
यशवंत मंडई आणि सीतागुंफा येथे मनपाच्या आरक्षित जागेवर दुमजली यांत्रिक पार्किंग उभारणार आहे.
गावठाणासाठी ३१५ कोटी
गावठाण भागाच्या विकासासाठी ३१५ कोटींचा खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे. गावठाणामधे चोवीस तास पाणी, स्काडा मीटर बसविण्याचे नियोजन आहे.
भुयारी पार्किंगसाठी नियोजन
शिवाजी स्टेडिअमच्या जागेवरही काही वाहनांसाठी भुयारी वाहनतळाची सोय होऊ शकते का, याविषयीही स्मार्ट सिटी कंपनीच्या संचालकांचा अभ्यास सुरू आहे.

Web Title: Smart parking in 33 places

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.