स्मार्ट पार्किंग गायब आणि टाेईंग सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:11 AM2021-06-10T04:11:12+5:302021-06-10T04:11:12+5:30
‘लोकमत’ने शहराच्या विविध ठिकाणी केलेल्या पाहणीत स्मार्ट सिटी ठेकेदाराने केवळ आखलेले पट्टे आणि डिस्प्ले बोर्डस् त्याच ठिकाणी जैसे थे ...
‘लोकमत’ने शहराच्या विविध ठिकाणी केलेल्या पाहणीत स्मार्ट सिटी ठेकेदाराने केवळ आखलेले पट्टे आणि डिस्प्ले बोर्डस् त्याच ठिकाणी जैसे थे आहेत. मात्र, त्याचे नियमन करण्यास कोणीच नसल्याचे आढळले आहे.
महापालिकेने स्मार्ट सिटी अंतर्गत मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये एकूण २८ ऑन स्ट्रीट तर पाच ऑफ स्ट्रीट पार्किंग म्हणजेच मोकळी मैदाने निश्चित केली आहेत. दोन वर्षांपासून यासंदर्भातील काम घोळत आहे. महापालिका आणि पोलीस यंत्रणेने निश्चित केलेल्या जागा या अत्यंत वर्दळीच्या तसेच शासकीय कार्यालय तसेच काही व्यापारी संकुलांलगत असून तेथे दोन मिनिटांसाठी वाहन उभे करायचे तरी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार असल्याने मुळातच नागरिकांनी त्यास विरोध केला होता. त्यातच कोरोनाचा संकट काळ सुरू झाला. त्यानंतर आताशी कुठे तरी अनलॉक सुरू होत असताना पोलिसांनी वाहनतळांची सोय नाही आणि वाहन कुठेही उभे केले तर वाहनांची उचलेगिरी करून दंड करणार, असा प्रकार सुरू झाल्याने आधी वाहनतळांची सोय करा; मगच वाहनधारकांवर कारवाई करा, अशी मागणी होत आहे.
इन्फो..
काय आढळले पाहणीत
इन्फो..१
जिल्हा परिषदेसमोर अस्ताव्यस्त वाहने
स्मार्ट सिटी ठेकेदाराने जिल्हा परिषदेच्या समोर वाहने लावण्याची सोय केली असली तरी सध्या तेथे काहीच नाही. मुळात नागरिक तेथे कामासाठी आल्यानंतर अभ्यागतांना जिल्हा परिषदेच्या आवारात प्रवेश नाही आणि वाहने बाहेर अस्ताव्यस्त स्वरूपात उभी आहेत.
इन्फो...२
शरणपूर रोडवर कॅनडा कॉर्नर म्हणजे बीएसएनएल कार्यालयाच्या कम्पाउंडलगतदेखील स्मार्ट सिटीने ऑफ स्ट्रीट पार्किंगसाठी आखणी केली आहे. मात्र तेथे कोणाचाही पत्ता नाही. त्यामुळे स्मार्ट सिटीचे पार्किंगच वाऱ्यावर असल्याचे दिसत आहे.
इन्फो...
६
महापालिकेचे एकूण विभाग
२८
ऑन स्ट्रीट पार्किंग
५
ऑफस्ट्रीट पार्किंग