मतिमंद शाळेतील विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2021 04:15 AM2021-07-30T04:15:08+5:302021-07-30T04:15:08+5:30
दत्तमंदिररोड येथील विकास मंदिर मतिमंद शाळेतील २५ विद्यार्थ्यांना रोटरी क्लब नाशिकतर्फे मोफत स्मार्ट मोबाईल वाटप करण्यात आले. ...
दत्तमंदिररोड येथील विकास मंदिर मतिमंद शाळेतील २५ विद्यार्थ्यांना रोटरी क्लब नाशिकतर्फे मोफत स्मार्ट मोबाईल वाटप करण्यात आले. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी रवींद्र परदेशी, ईनक्लेव चेअरचे अध्यक्ष संजय कलंत्री, भारतीय अपंग पुनर्वसन संस्थेचे उपाध्यक्ष जगदीश ठक्कर, सचिव सुहासिनी घोडके, खजिनदार दीपक मगर, विजय पाटील, भावना ठक्कर, रमन कपूर, स्नेहल गांगुर्डे, ॲड. महेश दंदणे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोनामुळे दीड वर्षापासून शाळा बंद आहेत. अशा काळात शिक्षक मुलांच्या घरी जाऊन शिकवीत असे. त्यामुळे शिक्षकांना अधिक वेळात कमी शिक्षण शिकविता येत होते. आता स्मार्ट मोबाईलमुळे एकाच वेळी जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जाईल. या स्मार्ट मोबाईलवर शिक्षण कसे घ्यायचे याबाबतची माहिती पालकांना देण्यात आली. स्मार्ट मोबाईलमुळे मुले शिक्षणांपासून वंचित राहणार नाहीत, असे संजय कलंत्री यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मा सोनवणे यांनी केले. यावेळी निखिल गांधी, वर्षा जोशी, स्वप्निल बाविस्कर, हितेश कारिया, विनायक पिल्ले, मनोज कलंत्री, अजित गुप्ता, नंदिनी कारिया, गोरव बर्वे, विनिता दास, प्रीती घोडके, बाळासाहेब भुजबळ, भारती सातगीर उपस्थित होते.
290721\29nsk_25_29072021_13.jpg
मतिमंद शाळेतील विद्याथ्य'ांना स्मार्ट फोन देतांना समाज कल्याण अधिकारी रविंद्र परदेशी, समवेत संजय कलंत्री,जगदिश ठक्कर, सुहासिनी घोडके, स्नेहल गागुर्डे,भावना ठक्कर दिपक मगर, आदि