स्मार्ट रोडचा प्रारूप आराखडा सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 01:00 AM2017-10-19T01:00:12+5:302017-10-19T01:00:39+5:30
अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका : केपीएमजीकडून तीन टप्प्यात सर्वेक्षण पूर्ण नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका हा १.१ कि.मी.चा मार्ग ‘स्मार्ट रोड’ म्हणून विकसित केला जाणार असून, केपीएमजी संस्थेने सदर रस्त्याचा प्रारूप आराखडा नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या बैठकीत सादर केला. सदर संस्थेने तीन टप्प्यात सर्वेक्षण नुकतेच पूर्ण केले आहे.
अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका : केपीएमजीकडून तीन टप्प्यात सर्वेक्षण पूर्ण
नाशिक : स्मार्ट सिटी अभियानांतर्गत अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका हा १.१ कि.मी.चा मार्ग ‘स्मार्ट रोड’ म्हणून विकसित केला जाणार असून, केपीएमजी संस्थेने सदर रस्त्याचा प्रारूप आराखडा नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या बैठकीत सादर केला. सदर संस्थेने तीन टप्प्यात सर्वेक्षण नुकतेच पूर्ण केले आहे.
कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थवील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत केपीएमजी संस्थेने स्मार्ट रोडचा प्रारूप आराखडा सादर केला.
अशोकस्तंभ ते त्र्यंबक नाका या मार्गाचे स्मार्ट रोडमध्ये रूपांतर करण्यासाठी केपीएमजी संस्थेने तीन टप्प्यात तीन वेळा सर्वेक्षण पूर्ण केले. प्रत्येकी १६ तासांचा एक सर्व्हे याप्रमाणे अशोकस्तंभ ते मेहेरसिग्नल, मेहेर सिग्नल ते सीबीएस चौक, सीबीएस चौक ते त्र्यंबक नाका या तीन लिंकचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात सदर मार्गावरील प्रत्येक चौकात, सिग्नलमध्ये किती वाहने मार्गस्थ होतात, रिक्षा स्टॅँडची संख्या, पथदीप, वृक्षांची संख्या यांची माहिती संकलित करण्यात आली. त्यानुसार, एक प्रारूप आराखडा तयार करून तो बुधवारी (दि.१८) सादर करण्यात आला. सदर आराखड्यासंदर्भात आता पोलीस आयुक्तालय, वाहतूक शाखा, महावितरण कंपनी, एसटी महामंडळ यांच्याशीही चर्चा करून अंतिम आराखडा तयार करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. बैठकीला महापालिकेचे शहर अभियंता उत्तम पवार यांच्यासह कंपनीचे अधिकारी उपस्थित होते....असा असेल
स्मार्ट रोड स्मार्ट रोडच्या दुतर्फा पादचारी मार्ग
पादचारी मार्गालगत ज्येष्ठांसाठी बेंचेस
किआॅक्सद्वारे शहरातील महत्त्वाच्या स्थळांची माहिती
स्मार्ट व आकर्षक पथदीप
मार्गावर ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे
दुतर्फा एक मीटर रुंदीचा सायकल ट्रॅक
मार्गावरील वीजतारा भूमिगत
रस्ता खोदू नये याकरिता डेक तयार करणारतीन ठिकाणी ‘वन वे’मार्गावर तीन ठिकाणी एकेरी मार्ग असणार आहे. आंबेडकर पुतळा ते सीबीएस हा एकेरी मार्ग असणार आहे. मेहेर ते रेडक्रॉस सिग्नल आणि सीबीएस ते त्र्यंबक नाका हा एकेरी मार्ग असणार आहे. केटीएचएम महाविद्यालयापासून अशोकस्तंभाकडे येणारी वाहने ही पशुवैद्यकीय दवाखान्याजवळून रामवाडीकडे जातील. त्यासाठी रामवाडीला समांतर पूल बांधण्याचेही प्रस्तावित आहे.