२५ हजार रुपये किमतीचा स्मार्टफोन केला परत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:16 AM2021-07-07T04:16:38+5:302021-07-07T04:16:38+5:30
पिंपळगाव बसवंत : रोज मोबाइल वापरताना आपण आपली अत्यंत वैयक्तिक माहितीसुद्धा आपल्या मोबाइलमध्ये सेव्ह करतो. फॅमिली फोटो ...
पिंपळगाव बसवंत : रोज मोबाइल वापरताना आपण आपली अत्यंत वैयक्तिक माहितीसुद्धा आपल्या मोबाइलमध्ये सेव्ह करतो. फॅमिली फोटो तर असतातच, पण महत्त्वाचे ई-मेल्स, फेसबुक व्हॉट्सॲपवरच्या चॅट्स.. काही महान लोक तर त्यात एटीम आणि क्रेडिट कार्डाचे पिन नंबर आणि इमेल्सचे पासवर्ड्स पण सेव्ह करतात. आता बोला ! पण… समजा हा असा अनेक गोष्टींचा साक्षीदार असलेला मोबाइल हरवला किंवा चोरीला गेला तर किती त्रास होतो हे ज्या व्यक्तीचा मोबाइल हरवला त्यालाच कळते.!
परिसरातील सुनील खोडे यांचा प्रवासादरम्यान जात असताना घाई गडबडीत अंदाजे सुमारे २५ हजार रुपये किमतीचा स्मार्ट मोबाइल फोन हरवला. हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांच्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखी ते त्या मोबाइलवर कॉल करू लागले, पण फोन काही उचलला जात नव्हता त्यामुळे मोबाइल आता पुन्हा मिळणारच नाही असे त्यांना वाटू लागले. ताबडतोब त्यांनी पोलीस ठाणे गाठले आणि हवालदार निंबेकर यांनी पूर्णपणे खात्री करून मोबाइल शेतकरी सुनील खोडे त्यांच्याकडे सुपूर्द केला. मोबाइल परत मिळाल्याने खोडे यांच्या आनंदाला पारावार राहिला नाही. त्यांनी सदर युवकाला ५०० रुपये बक्षीस देऊन त्या युवकाच्या इमानदारीने कौतुक केले.
----------------
अन् जीव भांड्यात पडला
महत्त्वाचा डेटा त्यात असल्याने आता करायचे काय? असा प्रश्न खोडे यांच्यासमोर पडला. मात्र पिंपळगाव येथील एका युवकाला त्यांचा मोबाइल सापडला होता. त्या युवकाने तो मोबाइल पिंपळगाव पोलीस ठाणे गाठून तो मोबाइल ठाणे अंमलदार शांताराम निंबेकर यांच्याकडे दिला. या मोबाइलवर आलेला कॉल निंबेकर यांनी घेतला व तुमचा मोबाइल पिंपळगाव पोलीस ठाण्यात आहे. एका युवकाला सापडला, त्याने इथे जमा केला आहे, तुम्ही या आणि घेऊन जा, असे सांगितल्यावर खोडे यांचा जीव भांड्यात पडला.
(०५ पिंपळगाव १)
050721\img_20210704_154836.jpg~050721\05nsk_5_05072021_13.jpg
सुनील खोडे यांचा हरवलेला मोबाईल फोन परत करतांना पोलीस हवालदार शांताराम निंबेकर व पवार~०५ पिंपळगाव १