'स्माइल प्लिज' म्हणणाऱ्यांची हरवली 'स्माइल'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:14 AM2021-05-27T04:14:32+5:302021-05-27T04:14:32+5:30

जळगाव नेऊर :... 'रेडी, स्माइल प्लिज म्हणत समोरील व्यक्तीच्या सुखद क्षणांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या फोटोग्राफर्सची स्माइल सध्या ...

'Smile' loses 'Smile' | 'स्माइल प्लिज' म्हणणाऱ्यांची हरवली 'स्माइल'

'स्माइल प्लिज' म्हणणाऱ्यांची हरवली 'स्माइल'

Next

जळगाव नेऊर :... 'रेडी, स्माइल प्लिज म्हणत समोरील व्यक्तीच्या सुखद क्षणांना आपल्या कॅमेऱ्यात कैद करणाऱ्या फोटोग्राफर्सची स्माइल सध्या लॉकडाऊनमुळे हरवली आहे. ऐन सिझनच्या काळात व्यवसायावर कुऱ्हाड कोसळल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली. आठवणींना फोटोत साठवून ठेवणाऱ्या फोटोग्राफर्सना देखील सरकारकडून थोडीफार सवलत मिळावी, अशी मागणी परिसरातील फोटोग्राफर वर्गातून होत आहे.

कोरोनामुळे अनेकांच्या उद्योग-धंद्यांवर विपरीत परिणाम झाला. मात्र, फोटोग्राफरकडे कोणाचेही लक्ष गेलेले नाही. फोटोग्राफ, फोटो-व्हिडिओ ॲक्सेसरीज विक्रेता, कलर लॅब, व्हिडिओ एडिटर्स या सर्वांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली आहे. सध्या विवाहाचा हंगाम आहे. या हंगामाची फोटोग्राफ प्रतीक्षा करत असतात. दोन महिन्यांपूर्वी कोरोनाने जिल्ह्यात दस्तक दिली, तेव्हा ऐन लग्नसराईलाही सुरुवात झाली होती. या सिझनमध्ये नियोजित उत्पनाची आशा या घटकाने बांधली होती. मात्र, लॉकडाऊनमुळे सर्व आशांवर पाणी फिरले आहे. थोड्या दिवसांनी परिस्थिती ठीक होईल, या आशेत असतानाच लॉकडाऊनचा कालावधी वाढतच गेला. त्यामुळे ऐन भरात येणारा फोटोग्राफीचा सिझन हातातून निसटला आहे. जवळचे साठवून ठेवलेले पैसेही आता संपले असल्याने आता या घटकावर उपासमारीची वेळ आली आहे.

-------------------

ऑर्डरची प्रतीक्षा

फोटोग्राफर, व्हिडिओग्राफर्स वर्षभर स्टुडिओमधील किरकोळ व्यवसायानंतर त्यांना सिझनची प्रतीक्षा असते. तुळशी विवाहापासून लग्नसराईचे मुहूर्त अंदाजे जुन-जुलैपर्यंत सुरू राहतात. या काळात फोटोग्राफर्स, व्हिडिओग्राफरला क्षणभराचीही उसंत नसते. वर्षभराची कमाई या काळातच होत असल्याने त्यांचे काम जोमाने चालते; परंतु यंदा त्यांचे शटर खाली असल्याने कमाईचे सर्व स्त्रोत बंद झाले आहेत.

----------------

दरवर्षी लग्नसराईत फोटोग्राफर्सना मोठी मागणी असते; परंतु कोरोना संसर्ग साथीच्या आजारामुळे छायाचित्रकारांना दुसऱ्या वर्षीही लग्नांना निर्बंध असल्यामुळे फोटो ग्राफरांना आर्थिक फटका बसला असून, उपासमारीची वेळ आली आहे. कॅमेरे व इतर साहित्य धूळखात पडले असून, शासनाने आर्थिक मदतीचा हातभार लावावा.

- सुभाष कदम, फोटोग्राफर (२६ जळगाव नेऊर)

===Photopath===

260521\26nsk_20_26052021_13.jpg

===Caption===

२६ जळगाव नेऊर

Web Title: 'Smile' loses 'Smile'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.