कोरेानामुळे पालकत्व गमावलेल्यांसाठी ’स्माईल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:11 AM2021-06-29T04:11:23+5:302021-06-29T04:11:23+5:30
संबंधित कुटुंबाला रोजगारासाठी एक ते पाच लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत देण्याची ही योजना असून यामध्ये ८० टक्के रक्कम एनएफडीसीकडून ...
संबंधित कुटुंबाला रोजगारासाठी एक ते पाच लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत देण्याची ही योजना असून यामध्ये ८० टक्के रक्कम एनएफडीसीकडून दिली जाणार आहे तर २० टक्के भांडवल अनुदान असणार आहे. ६ टक्के व्याजदाराने ६ वर्ष कालावधीची ही योजना राबविण्यात येत आहे. ३० जून पर्यंत अर्ज करण्याची अखेरची मुदत आहे.
येत्या १५ जूनपर्यंत काेरोनामुळे मृत झालेल्या कुटुंबीयांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. मृत व्यक्तीचे वय १८ ते ६० या दरम्यान असेल तरच कुटुंबीयांना योजनेचा लाभ मिळू शकणार आहे. अनुसूचित जातीच्या पीडितांनी महात्मा फुले कार्यालया किंवा एनएफडीसीच्या संकेतस्थळावर याबाबचे अर्ज भरता येणार आहे. मयत व्यक्तीचे नाव, आधारकार्ड, उत्पन्नाचा दाखला (तीन लाखांपर्यंत) कोविडमुळे मृत झाल्याचा दाखला, रेशनकार्ड, वयाचा पुरावा असे कागदपत्रे यासाठी लागणार आहे. \
--इन्फो--
आज अखेरचा दिवस
या योजनेसाठी ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष अर्ज भरण्याची मुदत ३० जून असल्याने संबंधितांनी अर्ज सादर करण्यासाठी महात्मा फुले कार्यालयात संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.