‘त्या’ ४८ मजुरांच्या चेहऱ्यावर झळकले स्मितहास्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 09:20 PM2020-05-15T21:20:54+5:302020-05-15T23:33:26+5:30

कळवण : कामानिमित्त कळवण परिसरात असलेल्या, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात जाहीर झालेल्या लॉकडाउननंतर अडकून पडलेल्या मजुरांना आपल्या घरी परतण्याची ओढ लागल्याने प्रशासनाच्या सहकार्यातून कळवण येथून मध्य प्रदेशातील ४८ मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले.

 The smiles on the faces of 'those' 48 workers | ‘त्या’ ४८ मजुरांच्या चेहऱ्यावर झळकले स्मितहास्य

‘त्या’ ४८ मजुरांच्या चेहऱ्यावर झळकले स्मितहास्य

Next

कळवण : कामानिमित्त कळवण परिसरात असलेल्या, परंतु कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे देशभरात जाहीर झालेल्या लॉकडाउननंतर अडकून पडलेल्या मजुरांना आपल्या घरी परतण्याची ओढ लागल्याने प्रशासनाच्या सहकार्यातून कळवण येथून मध्य प्रदेशातील ४८ मजुरांना त्यांच्या गावी पोहोचविण्यात आले.
यावेळी गावी परतत असल्याच्या आनंदात मजुरांच्या चेहºयावर स्मितहास्य उमटत प्रशासनाप्रती कृतज्ञतेचे भाव दिसून आले.
रोजगारासाठी मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, झारखंड यांसह अनेक राज्यांतील मजूर, व्यावसायिक कळवण परिसरात आहेत. देशभरात कोरोनाचा संसर्ग वाढू लागल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ मार्चला पहिला लॉकडाउन लागू केल्याने सर्व कामधंदे बंद झाले होते. हातावर पोट असणाºया या मजुरांसमोर रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे आपल्या गावी जाण्याची ओढ त्यांना लागली होती.
शासनाने तिसºया टप्प्यात लॉकडाउनमध्ये शिथिलता आणत योग्य ती कार्यवाही पूर्ण करून गावी जाण्यास परवानगी दिल्याने या मजुरांना दिलासा मिळाला होता.
या मजुरांना आपापल्या राज्यात जाण्यासाठी आॅनलाइन परवानगी घ्यावी लागत असल्याने
त्यांनी आॅनलाइन परवानगी मिळवल्यानंतर कळवणचे तहसीलदार बंडू कापसे
यांनी मध्य प्रदेशातील एकूण ४८ मजुरांची यादी कळवणचे आगार प्रमुख हेमंत पगार यांच्याकडे दिली. या मजुरांना नाशिकरोड रेल्वे- स्थानकापर्यंत जाण्यासाठी शासनाच्या निर्देशानुसार येथील प्रशासनाने एस. टी. बसची सोय केली होती.
कळवण बसस्थानकातून दोन बसेसमध्ये एकूण ४८ मजुरांना बसवून त्यांना नाशिकरोड रेल्वे स्थानक येथे सोडण्यात आले. तहसीलदार बंडू कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली कळवण बसस्थानकातून बस रवाना करतेवेळी नायब तहसीलदार डॉ. व्यंकटेश तुप्ते, आगारप्रमुख हेमंत पगार उपस्थित होते. नाशिकरोड रेल्वेस्थानकातून हे मजूर जिल्ह्यातील इतर मजुरांसह विशेष रेल्वेने मध्य प्रदेशकडे रवाना झाले. दोन महिन्यांनंतर आपल्या मूळ गावी परतता येत असल्याने मजुरांनी आनंद व्यक्त केला.
---------------------------
मध्य प्रदेशात जाण्यासाठी ४८ मजुरांनी नोंदणी केली होती. त्यानुसार सोशल डिस्टन्स ठेवून सर्व मजुरांना दोन बसमध्ये बसवून रवाना करण्यात आले. मजुरांना सोडताना योग्य काळजी घेण्यात आली.
- बंडू कापसे,
तहसीलदार, कळवण
---------------------------------------------------------
मजुरांना सोडण्यासाठी देण्यात आलेल्या सदर बसेस आधी निर्जंतुक करण्यात आल्या. मजुरांना सोडून कळवण येथे परतल्यानंतर सदर बसेस पुन्हा लगेच निर्जंतुक करण्यात आल्या.
- हेमंत पगार,
आगार व्यवस्थापक, कळवण

Web Title:  The smiles on the faces of 'those' 48 workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक