मुथूट फायनान्सच्या मुख्य सुत्रधाराच्या आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2019 11:53 AM2019-07-26T11:53:11+5:302019-07-26T11:55:22+5:30

घटना घडल्यापासून आरोपी अनेक राज्यात पोलिसांना चकमा देत फिरत होता. प्रत्येक वेळी मोबाईलचे सीम कार्ड बदलत असल्यामुळे त्याचे लोकेशन काढणे पोलिसांना अवघड झाले होते.

The smiles on the head of Muthoot Finance | मुथूट फायनान्सच्या मुख्य सुत्रधाराच्या आवळल्या मुसक्या

मुथूट फायनान्सच्या मुख्य सुत्रधाराच्या आवळल्या मुसक्या

Next
ठळक मुद्देसॉफ्टवेअर अभियंत्यांची गोळ्या घालून हत्या केली होतीत्याच्या ताब्यातून सहा सीम कार्ड व कार जप्त करण्यात आली आहे

नरेंद्र दंडगव्हाळ
नाशिक : सुमारे दोन महिन्यांपूर्वी नाशकातील उंटवाडी येथील मुथूट फायन्सासच्या कार्यालयात लुटीच्या इराद्याने घुसून प्रतिकार करणाऱ्या सॉफ्टवेअर अभियंत्यांची गोळ्या घालून हत्या करणा-या मुख्य सुत्रधाराच्या पोलिसांनी बिहारमधून मुसक्या आवळल्या आहेत. या गुन्ह्यात यापुर्वीच पोलिसांनी दोघांना अटक केल्याने या गुन्ह्यातील अटक आरोपींची संख्या तीनवर पोहोचली आहे.


आकाशसिंग विजय बहाद्दरसिंग राजपुत असे या मुख्य सुत्रधाराचे नाव असून, त्याला बिहार येथून ताब्यात घेण्यात आले आहे. घटना घडल्यापासून आरोपी अनेक राज्यात पोलिसांना चकमा देत फिरत होता. प्रत्येक वेळी मोबाईलचे सीम कार्ड बदलत असल्यामुळे त्याचे लोकेशन काढणे पोलिसांना अवघड झाले होते. दोन दिवसांपुर्वीच तो त्याची स्विफ्ट डिझायर कार (क्रमांक बी.आर. ३१ एस. ५४८८) घेण्यासाठी येणार असल्याची पक्की खबर पोलिसांना मिळाली होती त्यावरून पोलिसांनी बिहार मध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून तळ ठोकला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याच्या ताब्यातून सहा सीम कार्ड व कार जप्त करण्यात आली आहे. संशयित आकाशसिंग यानेच मुथूट फायनान्सच्या कार्यालयात अभियंता सॅम्युअल याच्यावर गोळी झाडली होती. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या या गुन्ह्याच्या तपासासाठी अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीपाद परोपकारी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार चव्हाण यांचेसह अंबड पोलीस ठाण्याचे कर्मचारी व युनिटचे सहाय्यक पोलीस आयुक्त आर.आर.पाटील यांचे पथक ९ जुलै रोजी बिहारला गेले होते.

Web Title: The smiles on the head of Muthoot Finance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.