आनंदी जगण्यासाठी चेहऱ्यावरील हास्य
By admin | Published: October 16, 2016 10:08 PM2016-10-16T22:08:08+5:302016-10-16T22:09:09+5:30
आनंदी जगण्यासाठी चेहऱ्यावरील हास्य
देवळा : सद्याच्या धकाधकीच्या जीवनात निरोगी व आनंदी आयुष्य जगण्यासाठी बालकांपासुन ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच हास्ययोग करण्याची आवश्यकता असून त्यासाठी गावागावात हास्ययोग क्लब निर्माण झाले पाहीजेत असे प्रतिपादन महाराष्ट्र हास्ययोग संघाच्या अध्यक्ष डॉ.सुषमा दुगड यांनी केले. देवळा येथील जि.प.विद्यानिकेतन शाळेत कोजागिरी पौर्णिमेनिमित्त आयोजित हास्ययोग कार्यक्र मात त्या बोलत होत्या.
अरु णोदय बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने ह्या कार्यक्र माचे आयोजन केले होते.कार्यक्र माच्या अध्यक्षस्थानी जि.प.विद्यानिकेतनचे प्राचार्य सतिश बच्छाव होते.अरु णोदय संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष अरु णा खैरणार,आबा खैरणार आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.प्रास्ताविक हेमंत बधान यांनी केले.डॉ.सुषमा बागड यांनी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना हास्ययोगाचे महत्त्व पटवून दिले.त्यांनी सांगितले कि हास्य हे आत्म्याचे संगीत असुन हास्ययोग नकारत्मकतेकडुन सकारात्मकतेकडे जायाला शिकवतो,हसण्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधरते,मनाची एकाग्रता वाढते.वय वाढते तसे हास्य कमी होत जाते.यासाठी नेहमी आनंदी राहण्यासाठी ह्लजगायचे ना मग हसाह्वहे त्यांनी पीक फ्लो मीटरच्या मदतीने प्रात्यिक्षक करु न सिध्द केले.उपस्थितांना त्यांनी हास्ययोग शिकवत सर्वांनाच त्यात सहभागी करु न घेतल्याने विद्यार्थ्यांसह सर्वांनीच हसण्याचा मनमुराद आनंद घेतला.कार्यक्र माच्या शेवटी सौ.अरु णा खैरणार यांनी आभार मानले. कार्यक्र मास सुनिल देवरे, के.डी.पाटिल, एस.जी. शिंदे ,एम.बी.हिरे, श्रीमती एस.आर. काकडे, एस.एम. सोनवणे, श्रीमती एस.बी. सोनवणे, भरत कुवर, आदींसह विद्यार्थी उपस्थित होते. (वार्ताहर)