गोदाकाठी धुक्याची दुलई !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2020 02:34 PM2020-01-01T14:34:26+5:302020-01-01T14:42:36+5:30

पारा ६.५ अंशांवर : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी थंडीचा निच्चांक सायखेडा : नवीन वर्षाच्या पहिल्याच पहाटे गोदाकाठसह निफाड तालुक्यात धुक्याने आपली झालर पसरून जणूकाही स्वागतच केले. थंडीने यंदाचा निच्चांक गाठला असून गोदाकाठ भागात ६.५ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे.

 Smoky bridegroom! | गोदाकाठी धुक्याची दुलई !

गोदाकाठी धुक्याची दुलई !

Next

सायखेडा : नवीन वर्षाच्या पहिल्याच पहाटे गोदाकाठसह निफाड तालुक्यात धुक्याने आपली झालर पसरून जणूकाही स्वागतच केले. थंडीने यंदाचा निच्चांक गाठला असून गोदाकाठ भागात ६.५ अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे. पिकांना थंडी अनुकूल असली तरी धुके मात्र शेती पिकांना नुकसानकारक ठरत आहे.
काही दिवसांपासून ढगाळ हवामान गेल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. थंडीत वाढ झाली आहे. यापुढे काही दिवस थंडी वाढत राहून 0 अंशावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान खात्याने थंडीत वाढ होणार असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार राज्यात महाबळेश्वर नंतर सर्वाधिक थंडी निफाड तालुक्यात असते. त्यामुळे येथे मागील वर्षी ज्या प्रमाणे दवं गोठले, हिमकन तयार होऊन झालर पसरली त्याप्रमाणे पुढील आठवड्यात पुन्हा एकदा ती वेळ येणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
थंडीचा परिणाम हा सर्वाधिक प्राण्यांना बसतो. शेतात, नदीच्या काठावर वास्तव्यास असणारे विविध प्राणी आणि शेतकऱ्यांच्या घरी असणारे पाळीव प्राणी यांना थंडीचा फटका बसतो. मानवी जनजीवन विस्कळीत होते. सकाळी अकरा वाजेपर्यंत माणूस घरातून बाहेर पडत नाही, त्यामुळे कामे रखडतात आणि रात्री इतक्या थंडीत शेतात पिकांना पाणी देऊ शकत नाही. त्यामुळे थंडी अनुकूल असली तरी तितक्याच प्रमानात डोकेदुखी ठरते.
------------------
शेतकरी धास्तावले
कांदे, गहू हरबरा या रब्बी हंगामातील पिकांना थंडी अनुकूल असते. पिकांवर रोग येत नाही. पिके जोमाने वाढतात, मात्र धुक्याने पिकांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून होतो. पीकाचे शेंडे करपू लागतात, मोठ्या प्रमाणावर वाढ थांबते. द्राक्ष पीकाला फटका बसतो फुगवण थांबते, भुरी नियंत्रणासाठी शेतकर्यांना कसरत करावी लागते महागड्या औषधांची फवारणी करावी लागते त्यामुळे वाढत्या थंडीने द्राक्ष उत्पादक शेतकरी धास्तावले आहे.
-------------------------
गोदाकाठ भागात नदीच्या काठी पहाटे मोठ्या प्रमाणावर धुके पसरलेले असते. नदीच्या पाण्याचे बाष्पीभवन आणि झाडे ,गवत यावर पडलेले दवं यामुळे हवेत गारवा निर्माण होतो. धुके आणि गारवा शरीराला स्पर्श करतांना वेगळीच अनुभूती येत असली तरी प्राणी, काही पिके यांना त्रासदायक ठरू शकते
- सागर पोटे, कोठूरे

Web Title:  Smoky bridegroom!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक