जीवनावश्यक वस्तूंचा सुरळीत पुरवठा:निकम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2020 08:36 PM2020-04-30T20:36:26+5:302020-04-30T23:25:51+5:30
मालेगाव : शहरात जीवनावश्यक वस्तूंची व रमजान काळात फळांची कमतरता होणार नाही, असे नियोजन महसूल विभागाकडून करण्यात आल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी दिली.
मालेगाव : शहरात जीवनावश्यक वस्तूंची व रमजान काळात फळांची कमतरता होणार नाही, असे नियोजन महसूल विभागाकडून करण्यात आल्याची माहिती अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांनी दिली.
महापालिका, पोलीस यंत्रणेत महसूल विभागाने समन्वय घडवून आणत शहरात भाजीपाला, दूध, फळे व इतर सुविधा पुरविण्यासाठी नियोजन केले आहे. प्रतिबंधित क्षेत्रात जीवनावश्यक वस्तू पोहचविल्या जात आहेत. यासाठी व्हॅलेंटरची नेमणूक करण्यात आली आहे. घटना व्यवस्थापक डॉ. पंकज आशिया, अपर जिल्हाधिकारी निकम, प्रांताधिकारी विजयानंद शर्मा, तहसीलदार चंद्रजित राजपूत, शिवकुमार आवळकंठे आदी अधिकारी शहरातील परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.
कोरोनाबाधित रुग्णालय परिसरातील सोयीसुविधा व तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्या आहेत. महसूल विभागाकडून शहरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जात आहे. काही पेट्रोलपंप सुरू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सोयीसुविधा पुरविणाऱ्यांना पासेस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. भाजीपाल्याच्या होलसेल व्यापाºयांसाठी तीन ठिकाणी भाजीमार्केट सुरू करण्यात आले आहेत. शहरालगतच्या दाभाडीरोड, चंदनपुरीगेट येथे भाजीपाला विक्री केंद्र तर स्टार हॉटेल येथे फळ विक्री केंद्र सुरू करण्यात आले आहे. होलसेल व्यापारी महापालिकेने ठरवून दिलेल्या दहा किरकोळ विक्री केंद्रावर भाजीपाला व फळे विक्री करीत आहेत. किराणा मालासाठी शहरात सहा डिलर्सची नेमणूक करण्यात आली आहे. या डिलर्सच्या माध्यमातुन किराणा माल विक्री केला जात आहे. दूधाचा सुरळीत पुरवठा केला जात आहे. याबरोबरच महसुल विभागाकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत.