संगीत विषय परीक्षेत एसएमआरके यश
By admin | Published: March 4, 2016 11:28 PM2016-03-04T23:28:39+5:302016-03-05T00:19:07+5:30
संगीत विषय परीक्षेत एसएमआरके यश
नाशिक : एसएमआरके महाविद्यालयातील संगीत विभागाच्या तीन विद्यार्थिनींनी ६८० विद्यार्थिनींमधून प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकावर स्थान पटकावले आहे. वृषाली भातंबरेकर प्रथम, मृदुला देव द्वितीय आणि सीमा बांबर्डेकर हिने तृतीय क्रमांक मिळविला. एकाच वेळी या तिघींनी विद्यापीठात प्रथम तीन क्रमांकाने येण्याचा मान पटकावला आहे.
वृषाली हिला पद्मश्री कल्याणजी सुवर्णपदक, डॉ. प्रभा अत्रे गानहिरा पुरस्कार, सी. रामचंद्र संगीत पुरस्कार, शारदा अत्रे ग्वाल्हेर घराणा पुरस्कार, प्रभा मोकाशी संगीत पुरस्कार, गानप्रिया कुसुमावती विष्णू दाबली पुरस्कार, उषा उमराणी पुरस्कार, शीव एम. खरे पुरस्कार, शिवपार्वती प्रतिष्ठानचा गुणवंत गौरव पुरस्कार आदि पुरस्कार मिळाले आहेत. मृदुला देव यांनाही डॉ. प्रभा अत्रे गानहिरा पुरस्कार मिळाला आहे. या विद्यार्थिनींना प्रा. अविराज तायडे, प्रा. नीलिमा बोकील, प्राचार्य डॉ. दीप्ती देशपांडे, प्राचार्य डॉ. मो. स. गोसावी आदिंचे मार्गदर्शन लाभले. (प्रतिनिधी)