तस्करी रोखली : पेठच्या नदीनाल्यात दडविलेला दीड लाखांचा सागाचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 08:17 PM2019-12-22T20:17:43+5:302019-12-22T20:19:40+5:30

नाशिक : महाराष्ट्र -गुजरात सीमेला लागून असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या पेठ, सुरगाणा, उंबरठाण या वनपरिक्षेत्रांमधील वनसंपदेवर गुजरातस्थित तस्करटोळीने पुन्हा वक्रदृष्टी ...

Smugglers seized: 1.5 lakh saga stocks seized in Peth river | तस्करी रोखली : पेठच्या नदीनाल्यात दडविलेला दीड लाखांचा सागाचा साठा जप्त

तस्करी रोखली : पेठच्या नदीनाल्यात दडविलेला दीड लाखांचा सागाचा साठा जप्त

Next
ठळक मुद्देबुंध्यांवर घडकाम; स्वामीत्वचिन्हांचा आभावसंपुर्ण सागाचा साठा अवैधरित्या वाहून नेला जाणार असल्याची खात्री एकूण ३१ नग जप्त करण्यास पथकांना यश आले आहे

नाशिक : महाराष्ट्र -गुजरात सीमेला लागून असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या पेठ, सुरगाणा, उंबरठाण या वनपरिक्षेत्रांमधील वनसंपदेवर गुजरातस्थित तस्करटोळीने पुन्हा वक्रदृष्टी केली आहे. पेठ परिक्षेत्रातील गोंडाळा शिवारात वनविभाग प्रादेशिक व वनविकास महामंडळाने सुमारे १ लाख ५० हजार ७०० रूपये किंमतीचा ३.५ घनमीटर इतका सागवान लाकडाच्या ३१ नगांचा साठा शनिवारी (दि.२१) मध्यरात्रीच्या सुमारास जप्त केला.
याबाबत पेठ वनक्षेत्रपाल कार्यालयाकडून मिळालेली माहिती अशी, वनपरिक्षेत्रात रात्रीच्या गस्तीवर असताना मिळालेल्या गोपनीय माहितीच्याअधारे प्रादेशिक वनक्षेत्रपाल सीमा मुसळे यांनी वनपाल, वनरक्षकांच्या पथकासह गोंडाळा शिवार मध्यरात्रीच्या सुमारास गाठले. यावेळी अतिरिक्त कुमक म्हणून तत्काळ झरी व आंबा येथील वनविकास महामंडळाचे वनक्षेत्रपाल प्रशांत जाधव, प्र्रवीण कानाडे यांनी धाव लवाजम्यासह धाव घेतली. गोंडाळा शिवारातील गुजरात सीमेलगत वाहणाऱ्या नार व केंग नदीच्या दुतर्फा वनखात्याच्या पथकाने सुमारे ५००मीटरपर्यंतचा परिसर पायी पिंजून गोंडाळा शिवारातून नदीकाठावर तस्करीच्या हेतूने दडवून ठेवलेले सागाच्या लाकडाचे १४ नग पहिल्यांदा शोधून काढले. त्यानंतर पुढे काही किलोमीटर अंतरावर टोकुर्णा नाल्यातून वनविकास महामंडळाच्या पथकाला १७ नग शोधण्यास यश आले. रात्री दहा वाजेपासून पहाटे चार वाजेपर्यंत वनविभाग प्रादेशिक व वनविकास महामंडळाच्या पथकांची शोधमोहीम सुरू होती. एकूण ३१ नग जप्त करण्यास पथकांना यश आले आहे. सागवान लाकडांचा हा साठा गुजरातकडे वाहून नेला जाणार होता; मात्र वनविभागाच्या सतर्कतेमुळे डाव उधळला गेला.

बुंध्यांवर घडकाम; स्वामीत्वचिन्हांचा आभाव
जप्त करण्यात आलेल्या सर्व सागाच्या लाकडांची पाहणी केली असता काही लाकडे हे ताजे तोडण्यत आलेले आढळून आले तर काही नग हे पंधरवड्यापुर्वी तोडले असल्याचा अंदाज वनअधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. साग वृक्षांचे बुंधे घडकाम करून संपुर्णत: तासून वाहतुकीसाठी सोपे ठरेल, यासाठी लहान-लहान नग तस्करांनी काही स्थानिक रहिवाशांच्या मदतीने तयार केल्याचे पंचनाम्यात आढळले. नगावर कोणत्याहीप्रकारचे स्वामित्व चिन्ह नसल्याने हा संपुर्ण सागाचा साठा अवैधरित्या वाहून नेला जाणार असल्याची खात्री वनविभागाच्या पथकाने पटविली असून साठा पेठ येथील आगारात सुरक्षितरित्या आणण्यात आल्याचे मुसळे यांनी सांगितले. सागाची चोरट्या मार्गाने तोड करून तस्करी करणा-यांचा पथकाकडून शोध घेतला जात आहे. अज्ञात तस्करटोळीविरूध्द भारतीय वनअधिनियम १९२७च्या कलम ५२नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Smugglers seized: 1.5 lakh saga stocks seized in Peth river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.