गार्इंची तस्करी करणारा टेम्पो उलटला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 01:06 AM2018-09-12T01:06:17+5:302018-09-12T01:06:26+5:30
मालेगावकडे अवैधरीत्या गाईंंची वाहतूक करणारा टेम्पो नामपूरजवळ रस्त्याच्या कडेला पलटला. यात सात गाई होत्या. यातील तीन गार्इंचा जागीच मृत्यू झाला.
नामपूर : मालेगावकडे अवैधरीत्या गाईंंची वाहतूक करणारा टेम्पो नामपूरजवळ रस्त्याच्या कडेला पलटला. यात सात गाई होत्या. यातील तीन गार्इंचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडली.
गार्इंनी भरलेला टेम्पो (क्र. एमएच ०३ एम ८९५२) नामपूरनजीक रस्त्याच्या कडेला खड्ड्यात उलटल्याने तीन गार्इंचा जागीच मृत्यू झाला, तर बाकीच्या गाई गंभीर जखमी झाल्या आहेत. अपघातानंतर चालक व मदतनीस फरार झाले आहेत. स्थानिक नागरिकांना पहाटे हा प्रकार लक्षात येताच माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक सावंत यांनी घटनेची माहिती पोलीस ठाण्यात दिली.
सदर घटना ही अमानुष असून, कमी जागेत गाई कोंबलेल्या
होत्या. जखमी गार्इंवर नामपूरचे पशुधन अधिकारी डॉ. कपिल खंडाळे, डॉ. अनिल निकुंभ,
डॉ. सीताराम सोनवणे यांनी
उपचार केले. या घटनेची चौकशी करण्याची मागणी नामपूर परिसरातील पशुपालकांनी केली आहे.