देसराणे येथे चंदनाच्या झाडांची तस्करी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 01:25 PM2018-11-26T13:25:29+5:302018-11-26T13:25:42+5:30
देसराणे :- कळवण तालुक्यातील देसराणे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील चंदनाची तस्करी झाली असून येथील दोघांच्या शेतातील चंदनाचे झाडे चोरट्यांनी कापून नेल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली.
देसराणे :- कळवण तालुक्यातील देसराणे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील चंदनाची तस्करी झाली असून येथील दोघांच्या शेतातील चंदनाचे झाडे चोरट्यांनी कापून नेल्याची घटना रविवारी मध्यरात्री घडली. देसराणे परिसरातील शेतकरी अशोक शंकर हिरे यांच्या गट नंबर २७४ मधील खाजगी मालकीचे चंदनाचे झाडे असून एक दोन झाडे रविवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी कापून नेली. तसेच लगत असलेल्या विनोद लक्ष्मण हिरे यांचा गट नंबर २७८ मधील चंदनाच्या झाडांना विद्युत उपकरण वापरून झाडांना छिद्रे पाडून झाडे परिपक्व झाली आहेत का याची खात्री चंदन चोरांकडून करण्यात आली आहे. अशोक हिरे या शेतकºयाचे ३० ते ४० हजार रु पयांचे नुकसान झाले आहे. सोमवारी सकाळी शेतकरी शेतात गेल्यानंतर सर्व प्रकार लक्षात आला व गावातील पोलिस पाटील विक्र म खरे यांनी घडलेल्या प्रकाराची सविस्तर माहिती कळवण पोलिसांना दिली. परिसरात चंदन चोराची तस्करी करणारी टोळी अनेक दिवसांपासून कार्यरत असल्याने वनविभाग तसेच पोलिसांना या घटनेचा मास्टर माइंड शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी या शेतकºयांनी केली आहे.