पोषण आहारात शिजला साप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 01:01 AM2018-07-06T01:01:24+5:302018-07-06T01:01:43+5:30
घोटी : इगतपुरी तालुक्यातील तळेगाव येथील अंगणवाडीमार्फत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात चक्क साप शिजला गेल्याची गंभीर बाब उघडकीस आली असून, खबरदारी म्हणून दोन बालके व एका मातेला उपचारार्थ इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
तळेगाव येथे पोषण आहारात आढळलेला मृत साप.
घोटी : इगतपुरी तालुक्यातील तळेगाव येथील अंगणवाडीमार्फत बालकांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारात चक्क साप शिजला गेल्याची गंभीर बाब उघडकीस आली असून, खबरदारी म्हणून दोन बालके व एका मातेला उपचारार्थ इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
इगतपुरी तालुक्यातील तळेगाव येथे बालविकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडी भरविण्यात येते. या अंगणवाडीत पंधरा बालके असून, त्यांना पोषण आहार दिला जातो. गुरुवारी सकाळी या अंगणवाडीत बालकांना तांदळाच्या खिचडीचे वाटप करण्यात आले.
या बालकाच्या मातांनी हा पोषण आहार घरी नेऊन बालकांना भरविला; मात्र यातील सुरेश कुंदे यांच्या मुलीला देण्यात आलेल्या पोषण आहारात चक्क साप शिजविला असल्याचे दिसून आले. याबाबतची कल्पना श्रमजीवी संघटनेचे तानाजी कुंदे यांना समजताच त्यांनी पंचायत समितीला कळविले. दरम्यान, या प्रकारानंतर पंचायत समिती प्रशासन खडबडून जागे झाले असून, प्रकल्प अधिकाºयांनी अंगणवाडीला भेट दिली. तसेच खबरदारी म्हणून शुभांगी सुरेश कुंदे (९ महिने), संजना प्रदीप वर्मा (५) व एक माता शीतल सुरेश कुंदे याना तत्काळ इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना उलट्यांचा त्रास होऊ लागला आहे.
दरम्यान, या अंगणवाडीची सेविका मुंबई येथे वास्तव्यास असून, गेल्या काही महिन्यांपासून ती या अंगणवाडीत गैरहजर असल्याची बाब समोर आली आहे.
दरम्यान, या घटनेची
चौकशी करण्याची मागणी श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे, तालुकाध्यक्ष संजय शिंदे, संतोष ठोंबरे यांनी केली आहे.इमारत नसल्याने उघड्यावरच भरते अंगणवाडीतळेगाव येथील अंगणवाडीसाठी इमारत नसल्याने अंगणवाडी उघड्यावर भरविण्यात येते. गुरुवारी सकाळी मिळालेला पोषण आहार माझी पत्नी घरी घेऊन आली. माझी सहा महिन्यांची मुलगी झोपली होती. हा आणलेला पोषण आहारातील काही भाग माझ्या पत्नीने खाल्ला आणि उर्वरित पोषण आहार माझी मुलगी झोपेतून उठल्यावर तिला खाऊ घालत असताना या पोषण आहारात मृत साप दिसून आल्याचे पालकांनी सांगितले़सदरची घटना गुरुवारी सकाळी मला समजल्यानंतर मी पथकासह गावात पोहचलो. येथील बालकांना तत्काळ इगतपुरीच्या ग्रामीण
रु ग्णालयात दाखल केले. मात्र या पोषण आहारात असलेला कीडा पोषण आहार शिजविण्यापूर्वी पडला होता की, शिजल्यानंतर टाकण्यात आला याची चौकशी करणे आवश्यक आहे. यासाठी हा कीडा आणि पोषण आहाराची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार असून, यातून हा हलगर्जीपणा सिद्ध झाल्यास दोषींवर निश्चित कारवाई करू.
- सोपान ढाकणे,
प्रकल्पाधिकारीतळेगाव येथील अंगणवाडीमधील पोषण आहारात पडलेल्या सापाची तपासणी करण्यासाठी आरोग्य पथक तळेगावात दाखल झाले असून, हे पथक पोषण आहार व मृत सापाची तपासणी करण्यासाठी प्रयोग शाळेत पाठविण्यात येणार आहे. त्यांच्या अहवालात नंतर चित्र स्पष्ट होईल.
सुरेश कुंदे, पालक