उंबरविहीर शेतशिवारात सापांची जुळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2020 02:56 PM2020-04-18T14:56:22+5:302020-04-18T14:57:45+5:30

अलंगुण : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंप्री (माळेगाव) गावालगतच्या दादा मुरलीधर वाघ यांच्या उंबरविहीर या शेतशिवारात धामण जातीच्या सापांची अनोखी जुळण दिसून आली. या परिसरात काही प्रमाणात जंगल आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा धोका नको म्हणून शेतकरी आपल्या शेतात ठराविक वेळेत पुरतेच काम करतात.

Snake match at Umbervir farm | उंबरविहीर शेतशिवारात सापांची जुळण

उंबरविहीर शेतशिवारात सापांची जुळण

Next
ठळक मुद्देसुमारे १० ते १२ फूट लांबीचे भलेमोठे धामण जातीच्या सापांची जुळण दिसली.

अलंगुण : त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पिंप्री (माळेगाव) गावालगतच्या दादा मुरलीधर वाघ यांच्या उंबरविहीर या शेतशिवारात धामण जातीच्या सापांची अनोखी जुळण दिसून आली. या परिसरात काही प्रमाणात जंगल आहे. सध्या कोरोना विषाणू संसर्गाचा धोका नको म्हणून शेतकरी आपल्या शेतात ठराविक वेळेत पुरतेच काम करतात.
शुक्रवारी (दि.१७) दादा मुरलीधर वाघ रा. पिंप्री (माळेगाव) ता. त्र्यंबकेश्वर हे आपल्या उंबरविहीर शेतशिवारात काम करत असतांना एका मोकळ्या जागेत सुमारे १० ते १२ फूट लांबीचे भलेमोठे धामण जातीच्या सापांची जुळण दिसली. यावेळी सुरवातीला दादा वाघ या शेतकऱ्याच्या अंगावर भीतीचे काटे उभे राहिले.
सध्या कोरोना व्हायरस या महामारिने अवघ्या जगाला विळखा घातला आहे. शेतकऱ्यांच्या शेतीलाही यामुळे फटका बसला आहे. शेतातील पिकांना भाव मिळत नाही. त्यामुळे शेतात राब-राब राबून बिगर कोरोनाचे का मरावे असा सवाल शेतकºयांचे मनात येत आहे. माणसाने आज पर्यंत निसर्गाचा उपयोग स्वार्थापोटीच केलेला आहे. आज एका सूक्ष्म कोरोना विषाणूला हरवण्याचे कोणतेही ठोस शस्त्र माणसाकडे नसल्यामुळे जीव वाचवण्यासाठी घरात दडून बसावे लागले आहे. याउलट निसर्गातील जैवविविधता मोकळेपणाने निसर्गाच्या अंगणात मुक्तपणे खेळताना, संचार करताना दिसून येत आहे. यात पशू-पक्ष- प्राणी-जलचर-उभयचर हे सर्वच मुक्त वावरतांना दिसत आहेत.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर माणसांना घरात दडून बसण्याची वेळ आली आहे. वास्तविक पाहता माणसानेच माणसावर ही वेळ ओढवून आणली आहे. कारण माणसाने वर्षानुवर्षे निसर्गात अनाठायी व अविवेकी हस्तक्षेप केला आहे. त्याचे अनेक पर्यायी परिणाम भोगण्याची वेळ मानव जातीवर येत आहे.
(फोटो १८ साप, १)

Web Title: Snake match at Umbervir farm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.