मनमाडला रेल्वेत चोरी करणाऱ्या चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 08:39 PM2021-01-04T20:39:03+5:302021-01-05T00:07:47+5:30

मनमाड: धावत्या महाराष्ट्र एक्सप्रेसमध्ये महिला प्रवाशाची पर्स लांबवणाऱ्या चोरट्याच्या अवघ्या चोवीस तासात मुसक्या आवळण्यात लोहमार्ग पोलिसांना यश मिळाले आहे. या सराईत गुन्हेगाराकडून अन्य काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता लोहमार्ग पोलिसांनी व्यक्त केली आहे.

The snarls of a thief stealing a train | मनमाडला रेल्वेत चोरी करणाऱ्या चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

मनमाडला रेल्वेत चोरी करणाऱ्या चोरट्याच्या आवळल्या मुसक्या

googlenewsNext
ठळक मुद्देमनमाड : लोहमार्ग पोलिसांची कारवाई

आरती प्रमोद दळवी रा. मरावती ते पुणे असा प्रवास करत होत्या. रात्री बर्थवर झोपेत असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या हातात अडकवलेली पर्स ओढून धावत्या गाडीतून उतरण्याचा प्रयत्न केला. मात्र दळवी यांनी विरोध केला असता झटापटीत त्यासुद्धा गाडीतून पडून जखमी झाल्या. चोरट्याने अंधाराचा फायदा घेत गाडीतून उतरून पलायन केले. गाडीतील प्रवाशांनी साखळी ओढून गाडी थांबवली व जखमी दळवी यांना गाडीत बसवले. याबाबत प्रवासी महिलेची मुलगी हर्षदा प्रमोद दळवी यांनी मनमाड लोहमार्ग पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून पोलीस निरीक्षक शरद जोगदंड यांनी तपासाची चक्रे फिरवली. दिनेश पवार, संतोष भालेराव, रूपेश ढवळे, रोशन गोंडेकर, गणेश खैरनार, रेसुब कर्मचारी सागर वर्मा, दादाराव सदरे यांच्या पथकाने रेल्वे परिसर पिंजून काढला. याबाबत लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.
फलाट क्रमांक सहाच्या दिशेने असलेल्या भारतनगरमध्ये भंगार दुकानाच्या बाहेर झोपलेल्या आकाश रतन मोरे याच्या डोक्याला दवाखान्याची पट्टी बांधलेली असल्याची गुप्ता माहिती मिळाल्याने संशय बळावला. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता महिला प्रवाशाकडून चोरलेली पर्स, दोन मोबाइल, आधारकार्ड व रोख रक्कम असा सात हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. या आरोपीकडून अजूनही काही गुन्हे उघड होण्याची शक्यता असल्याचे पोलीस निरीक्षक जोगदंड यांनी सांगितले.

Web Title: The snarls of a thief stealing a train

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.