व्हायरल व्हिडीओवरून नागाचा छळ करणारा ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2020 11:34 PM2020-03-06T23:34:06+5:302020-03-06T23:34:28+5:30
नागाला पकडून त्याच्या डोक्यावर काठीने फटके मारून आणि त्याने फणा उगारल्यानंतर त्याचे दात नेलकटरने कापल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने त्याचा शोध घेत निफाड तालुक्यातील खेडे येथील शिवाजी श्रीपत साबळे या संशयितास ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
सायखेडा : नागाला पकडून त्याच्या डोक्यावर काठीने फटके मारून आणि त्याने फणा उगारल्यानंतर त्याचे दात नेलकटरने कापल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वनविभागाने त्याचा शोध घेत निफाड तालुक्यातील खेडे येथील शिवाजी श्रीपत साबळे या संशयितास ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
एकाने नागाला पकडून त्याच्या डोक्यावर काठीने फटके मारत आणि फणा उभारताच त्याच्या दातांना नेलकटरने कट करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सदर माहिती वनविभागाला मिळताच या व्यक्तीचा शोध सुरू करण्यात आला. यामध्ये व्हिडीओतील व्यक्ती ही निफाड तालुक्यातील खेडे येथील असल्याचे आढळून आले. त्यानुसार, वनविभागाच्या पथकाने खेडे येथे जाऊन सदर इसम शिवाजी श्रीपत साबळे याच्या घरावर छापा टाकला आणि त्याला ताब्यात घेतले. पोलिसांनी साबळे यास न्यायालयात उभे केले असता, त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. या मोहिमेत वनक्षेत्र अधिकारी संजय भंडारे, जी. बी. वाघ, एम. बी. पवार, नागपुरे, बिन्नर यांनी विशेष भूमिका पार पाडली. मिळालेल्या माहितीनुसार, साबळे याने उगाव येथे सकाळी गावात असताना एका नागाला पकडले. नागाने फणा उभारताच दातांना नेलकटरच्या सहाय्याने कट करण्याचा प्रयत्न केला.