जिल्ह्यात आतापर्यंत ३२ हजार कोरोना रुग्णांना दिलासा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2020 11:19 PM2020-09-04T23:19:59+5:302020-09-05T01:16:46+5:30
आतापर्यंत जिल्ह्यातील ३२ हजार १३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सद्यस्थितीत सात हजार ४१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ९०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
नाशिक : आतापर्यंत जिल्ह्यातील ३२ हजार १३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, सद्यस्थितीत सात हजार ४१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत ९०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
नाशिक मनपा क्षेत्रात चार हजार ३४३, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात ५६९ तर जिल्ह्याबाहेरील १८ असे एकूण ७ हजार ४१७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, तसेच आजपर्यंत जिल्ह्यात ४० हजार ४५३ रुग्ण आढळून आले आहेत. ४० हजार ४५३ कोरोनाबाधित रुग्णांपैकी ३२ हजार १३६ रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज. सध्या जिल्ह्यात उपचार घेत असलेले ७ हजार ४१७ पॉझिटिव्ह रुग्ण.
नाशिक ग्रामीणमध्ये ७२.३३ टक्के, नाशिक शहरात ८२.४४ टक्के, मालेगावमध्ये ७४.६० टक्के तर जिल्हा बाह्यरुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ८२.१३ टक्के आहे, तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ७९.४४ टक्के इतके आहे. नाशिक ग्रामीण २५४, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ५०९, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून ११३ व जिल्हाबाहेरील २४ अशा एकूण ९०० रुग्णांचा मृत्यू झाला आहे.