जिल्ह्यात आत्तापर्यंत ३३ शेतकऱ्यांची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2018 01:27 AM2018-05-08T01:27:56+5:302018-05-08T01:28:18+5:30

कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि सततच्या नापिकीला कंटाळून नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, दिंडोरी, सिन्नर आणि नांदगाव तालुक्यात पुन्हा तीन शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याच्या धक्कादायक घटना पुढे आल्या आहेत. गेल्या आठवडाभरात जिल्ह्णातील विविध भागातील ५ शेतकºयांनी आत्महत्या केली असून, चालू वर्षात आत्महत्या करणाºया शेतकºयांची संख्या ३३ झाली आहे.

 So far, 33 farmers committed suicide in the district | जिल्ह्यात आत्तापर्यंत ३३ शेतकऱ्यांची आत्महत्या

जिल्ह्यात आत्तापर्यंत ३३ शेतकऱ्यांची आत्महत्या

Next

नाशिक : कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या आणि सततच्या नापिकीला कंटाळून नैराश्याच्या गर्तेत अडकलेल्या जिल्ह्यातील शेतकºयांच्या आत्महत्यांचे सत्र सुरूच असून, दिंडोरी, सिन्नर आणि नांदगाव तालुक्यात पुन्हा तीन शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याच्या धक्कादायक घटना पुढे आल्या आहेत.गेल्या आठवडाभरात जिल्ह्णातील विविध भागातील ५ शेतकºयांनी आत्महत्या केली असून, चालू वर्षात आत्महत्या करणाºया शेतकयांची संख्या ३३ झाली आहे. कर्जबाजारीपणा, नापिकी यांसारख्या संकटांनी पिचलेल्या शेतकºयांमध्ये नैराश्य वाढीस लागत असून, खरीपपूर्व मशागतीची वेळ तोंडावर आली असताना शेतकºयांना त्यांच्या समस्यांवर तोडगा मिळत नसल्याने ते स्वत:ची जीवनयात्रा संपविण्याचा टोकाचा निर्णय घेत असल्याचे या घटनांवरून दिसून येत आहे.  दिंडोरी तालुक्यातील मडकीजांब येथील शेतकरी पद्माकर कारभारी आवारे (३५) यांनी विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी उघडकीस आली. याबाबतचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला आहे. तर सिन्नर तालुक्यातील भोकणी येथील लक्ष्मण कारभारी साबळे (६८) या शेतकºयाचा मृतदेह पांगरी शिवारातील विहिरीमध्ये आढळून आला.  नांदगाव तालुक्यातही चांदोरा येथील एका शेतकºयाने विषारी औषध सेवन करून आत्महत्या केल्याचे वृत्त असून, जिल्हा प्रशासनाकडून याबाबत प्राथमिक माहिती देण्यात आली आहे.  याच आठवड्यात इगतपुरी तालुक्यातील उभाडे येथे लुखा नामदेव भोर (४५) या शेतकºयाने विषप्राशन करून जीवनयात्रा संपविली. १ जानेवारी ते ६ मे २०१८ या कालावधीत जिल्ह्यातील तब्बल ३३ शेतकºयांनी आत्महत्या केल्याने त्यांच्या कुटुंबीयांवर आभाळ कोसळले आहे.
सन्मान यात्रेची घोषणा
विशेष म्हणजे कर्जबाजारीपणा आणि सततच्या नापिकीमुळे खचलेल्या शेतकºयांना धीर देण्यासाठी व आत्महत्यांपासून परावृत्त करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एकीकडे शेतकरी सन्मान यात्रेची नाशिक शहरातून घोषणा केली असताना याच कालावधीत जिल्ह्णात जवळपास पाच शेतकºयांनी मृत्यूला कवटाळल्याच्या क्लेषदायक घटना पुढे आल्या आहेत. शेतकºयांच्या वाढत्या आत्महत्या चिंताजनक आहेत.

Web Title:  So far, 33 farmers committed suicide in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.