उत्तर महाराष्ट्रात म्युकर मायकोसिसमुळे आतापर्यंत ८१ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:20 AM2021-06-16T04:20:28+5:302021-06-16T04:20:28+5:30

मार्च ए्प्रिल महिन्यात नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात काेरोनाने थैमान घातले होते. कोरोनामुक्तीचा दर वाढत असताना दुसरीकडे मात्र उपचारादरम्यान स्टेराईडस आणि ...

So far 81 patients have died due to mucosal mycosis in North Maharashtra | उत्तर महाराष्ट्रात म्युकर मायकोसिसमुळे आतापर्यंत ८१ रुग्णांचा मृत्यू

उत्तर महाराष्ट्रात म्युकर मायकोसिसमुळे आतापर्यंत ८१ रुग्णांचा मृत्यू

Next

मार्च ए्प्रिल महिन्यात नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात काेरोनाने थैमान घातले होते. कोरोनामुक्तीचा दर वाढत असताना दुसरीकडे मात्र उपचारादरम्यान स्टेराईडस आणि तत्सम इंजेक्शनमुळे अनेकांना कोराेना पश्चात व्याधी जडल्याचे लक्षात येत आहेत. सर्वाधिक गंभीर आजार म्युकमायकोसिसचा असून अनेकांसाठी तो जीवघेणा ठरला आहे. ब्लँक फंगस नामक या आजारासाठी सध्या शासकीय पातळीवर देखील विविध उपाययोजना करण्यात येत आहे. मात्र, रुग्णांची संख्या वाढतच असल्याचे शासकीय नोंदीवरून आढळत आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार आणि अहमदनगर येथे आतापर्यंत ८५६ रुग्ण आढळले आहेत. यातील २७९ रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत. ८१ रुग्णांचा मृत्यू झाला असून सध्या ४८८ रुग्ण उपचार घेत आहेत.

उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण नाशिक जिल्ह्यात आढळले आहेत. नाशिक जिल्ह्यात

५४२ रुग्ण नाशिकमध्ये आढळले असून त्यातील २०५ रुग्ण उपचाराअंती बरे झाले आहेत तर ५७ जणांचा मृत्यू झाला. सध्या २८० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

धुळे जिल्ह्यात ११० रुग्ण आढळले असून त्यातील चार रूग्णांचा मृत्यू झाला. बारा रुग्ण बरे झाले तर ९४ रुग्ण उपचार घेत आहेत. जळगाव जिल्ह्यात ६३ पैकी ४७ रुग्ण उपचार घेत दोघेजण बरे झाले. या जिल्ह्यात आतापर्यंत आठ रुग्णांचा मृत्यू झाला. नंदुरबार जिल्ह्यात ३३ पैकी ३१ रुग्ण उपचार घेत आहेत. अहमदनगर जिल्ह्यात १०८ पैकी ६० रुग्ण बरे झाले आहेत. १२ जणांचा मृत्यू झाला. सध्या ३६ रुग्ण उपचार घेत आहेत.

इन्फो...

डॉक्टरांचा सल्ला न जुमानता रुग्ण घरी

म्युकरमायकोसिसच्या उपचारासाठी सोय असली आणि शासनाने शासकीय योजनेतून उपचारासाठी सोय केली असली तरी अनेक ठिकाणी रुग्णांना खर्च परवडत नाही तसेच ॲम्फोटेसीन बी हे इंजेक्शन्सदेखील मिळणे कठीण आहे. उत्तर महाराष्ट्रातील आठ रुग्ण हे रुग्णालयात दाखल न होताच घरी परतल्याची आरोग्य विभागाकडे नोंद असून ते या कारणामुळेच निघून गेल्याची चर्चा आहे.

Web Title: So far 81 patients have died due to mucosal mycosis in North Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.