...तर शासकीय आस्थापनांना मोफत रोपे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2020 10:23 PM2020-06-30T22:23:08+5:302020-06-30T22:24:13+5:30
नाशिक : कोविड-१९मुळे यंदा नव्या सरकारकडून वनमहोत्सव अभियानाच्या स्वरूपात राबविला जाणार नाही. या अभियानावरील निम्म्यापेक्षा अधिक निधी कोविड उपाययोजनांकडे वळविण्यात आला आहे. यामुळे यंदा वनविभागासह शासकीय आस्थापनांकडून स्वयंस्फूर्तीने रोपांची लागवड केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कोविड-१९मुळे यंदा नव्या सरकारकडून वनमहोत्सव अभियानाच्या स्वरूपात राबविला जाणार नाही. या अभियानावरील निम्म्यापेक्षा अधिक निधी कोविड उपाययोजनांकडे वळविण्यात आला आहे. यामुळे यंदा वनविभागासह शासकीय आस्थापनांकडून स्वयंस्फूर्तीने रोपांची लागवड केली जाणार आहे.
दरवर्षी १ जुलैपासून महिनाभर वनमहोत्सव राज्यस्तरावर साजरा केला जातो. मागील वर्षी ५० कोटी रोपे लागवडीचे उद्दिष्ट तत्कालीन सरकारने पूर्ण केले. यावर्षी नव्या सरकारकडून प्रारंभी राज्यात दहा कोटी रोपांची लागवड करून वनमहोत्सव साजरा करण्याची घोषणा केली गेली; मात्र कोरोना आजाराचा मुकाबला करण्यासाठी राज्य सरकारला वनमहोत्सवाचे अभियान रद्द करत या निधीपैकी ६७ टक्के निधी कोविड उपाययोजांकडे वळवावा लागल्याची माहिती महसूलच्या सूत्रांनी दिली. यामुळे यंदा वनमहोत्सव अभियानाच्या स्वरूपात साजरा होणार नाही. मात्र स्वयंस्फूर्तीने रोपांची लागवड वनजमिनीवर केली जाणार आहे.
यासाठी कुठल्याहीप्रकारचे उद्दिष्ट वनखात्याने ठेवलेले नाही; मात्र वनविभाग प्रादेशिकच्या पूर्व व पश्चिम भागाकडून राज्य आराखड्यांतर्गत वृक्षलागवडीचे ‘टार्गेट’ पार पाडले जाणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या १५० हेक्टरवरील वृक्षलागवडीसाठी मात्र पश्चिम वनविभागाकडे निधी अद्याप उपलब्ध झालेला नाही. वनमहोत्सवाचा कालावधी सप्टेंबरपर्यंत असल्याने नागरिकांनाही यानिमित्त वाजवी शासकीय दराने रोपे दिली जाणार आहेत.नाशिक पश्चिम भागाकडे एकूण ७ लाख २९ हजार रोपे वाढीव स्वरूपात तयार आहेत. यामधून विविध शासकीय आस्थापनांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेल्या उद्दिष्टानुसार शासकीय दराने रोपांचा पुरवठा केला जाणार आहे; एखाद्या अस्थापनाच्या प्रमुखांनी अनुदानाची अडचण लेखी स्वरूपात सांगितल्यास संबंधितांना त्यांच्या मागणीप्रमाणे मोफत रोपे देण्याची तयारी नाशिक पश्चिम वनविभागासह सामाजिक वनीकरण विभागानेही केली आहे.१८ लाख रोपे उपलब्धनाशिक पश्चिम वनविभागाकडे विविध रोपवाटिकांमध्ये एकूण १८ लाख ८३ हजार रोपांची सध्यिस्थतीत उपलब्धतता आहे. या विभागाकडून नाशिक, सिन्नर, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या परिक्षेत्रांतर्गत विविध गावांमध्ये ३२ हेक्टर जागेवर एकूण ११ लाख ५४ हजार रोपांची लागवड केली जाणार असल्याची माहिती उपवनसंरक्षक शिवाजी फुले यांनी दिली.