...तर बाजार समित्या आठ दिवस बंद ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2021 04:14 AM2021-04-25T04:14:43+5:302021-04-25T04:14:43+5:30

येवला विश्रामगृह येथे शनिवारी (दि.२४) येवला व निफाड तालुक्यांतील कोरोना सद्य:स्थिती व उपाययोजना याबाबत आढावा बैठकीत बोलताना भुजबळ ...

... so keep the market committees closed for eight days | ...तर बाजार समित्या आठ दिवस बंद ठेवा

...तर बाजार समित्या आठ दिवस बंद ठेवा

Next

येवला विश्रामगृह येथे शनिवारी (दि.२४) येवला व निफाड तालुक्यांतील कोरोना सद्य:स्थिती व उपाययोजना याबाबत आढावा बैठकीत बोलताना भुजबळ यांनी सांगितले की, गृहविलगीकरण करण्यात आलेल्या रुग्णांची व्यवस्था घरी होत नसेल, तर त्यांना कोविड सेंटरला हलविण्यात यावे, तसेच त्यांची घरी जाऊन नियमित तपासणी करण्यात यावी. विलगीकरण सेंटरची आवश्यकता असेल, तर त्यांची संख्या वाढविण्यात यावी. गावपातळीवरही टेस्टिंगची संख्या वाढविण्यात येऊन रुग्णांचे विलगीकरण करण्यात यावे, असेही भुजबळ यांनी सांगितले. ऑक्सिजनची कमतरता असल्याने सिलिंडर नियमित भरून ठेवण्यात यावेत. मृत्यूदर घटविण्यासाठी अथक प्रयत्न करावेत. कंटेन्मेंट झोनमध्ये नियमांचे काटेकोर पालन होईल, याकडे विशेष लक्ष द्यावे. जिल्ह्यातील मोठ्या बाजारपेठा सुरू राहिल्यास रुग्णसंख्या अधिक वाढत असेल, तर किमान आठ दिवस बाजार समित्या बंद ठेवण्यात याव्यात. त्यांना आवश्यक त्या परवानग्या देण्याबाबत भुजबळ यांनी दूरध्वनीद्वारे पणन सचिवांशी चर्चाही केली. येवला व निफाड तालुक्यांतील पाणीटंचाईबाबतही त्यांनी आढावा घेऊन नियमित टँकर सुरू ठेवण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

इन्फो

लढाई लोकचळवळ व्हावी

कोरोनाच्या लढ्यात आता नागरिकांची भूमिका अधिक महत्त्वाची असणार आहे,

त्यासाठी ही लढाई आता लोकचळवळ व्हायला हवी, नागरिकांनीही आता सजग राहून आपल्या परिसरातील रुग्णांची माहिती संबंधित विभागाला देण्यात यावी, तसेच रेमडेसिविरची गरज असेल, तरच वापर करण्यात यावा, असेही भुजबळ यांनी सांगितले.

फोटो - २४ भुजबळ येवला

येवला येथे आढावा बैठकप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ. समवेत अधिकारी वर्ग.

===Photopath===

240421\24nsk_42_24042021_13.jpg

===Caption===

फोटो - २४ भुजबळ येवलायेवला येथे आढावा बैठकीप्रसंगी पालकमंत्री छगन भुजबळ. समवेत अधिकारी वर्ग. 

Web Title: ... so keep the market committees closed for eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.