तर साहित्य संमेलन आवश्यकच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:13 AM2021-01-18T04:13:02+5:302021-01-18T04:13:02+5:30
नाशिकमध्ये साहित्य संमेलन होत असल्याने त्या संदर्भात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. हौशे, गवसे,नवशे सर्वत्र असतात हे मान्य करून ...
नाशिकमध्ये साहित्य संमेलन होत असल्याने त्या संदर्भात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. हौशे, गवसे,नवशे सर्वत्र असतात हे मान्य करून चार दिवसाच्या साहित्य सोहळ्यात आपणहून जावे, तिथे चक्कर मारावी, संमेलन काय असते ते पहावे आणि स्वतःसाठी काही पुस्तके खरेदी करावी अशी इच्छा संमेलन ज्या गावी असते तेथील जवळपासच्या अनेक नागरिकांची इच्छा असते.
संमेलन म्हणजे निव्वळ उत्सव,जत्रा अशी कितीही टीका झाली तरी साहित्य आणि व्यवहाराच्या संबंधित असलेल्या या संमेलनाकडे येणारा लोकांचा प्रवाह अखंडित वाहता राहणार त्याला आपण कसे रोखणार? या सगळ्याची सांगड संयोजकांना घालायला लागेल जेव्हा संमेलन कोरोनाच्या काळात घेतले आहे तेव्हा या सगळ्याचा विचार साकल्याने झाला असेलच.
कॉलेज, शाळेतील विद्यार्थ्यांना तेथे आणायला पाहिजे. या निमित्ताने विद्यार्थी कदाचित वाचायला लागतील. हेच संमेलनाचे यश ठरू शकेल.
- मिलिंद मधुकर चिंधडे.