...तर कारोना संपेपर्यंत बाजार समिती बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:14 AM2021-03-21T04:14:57+5:302021-03-21T04:14:57+5:30
नाशिक: कृषी उत्पन्न बाजार समितीत होणाऱ्या गर्दीमुळे नियमांचे उल्लंघन होत असल्याने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बाजार समिती बंद करण्याचा ...
नाशिक: कृषी उत्पन्न बाजार समितीत होणाऱ्या गर्दीमुळे नियमांचे उल्लंघन होत असल्याने जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी बाजार समिती बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर बाजार समितीत गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठीचे नियोजन करण्यात आले. बाजार समितीत गर्दी होत असल्याची तक्रार आल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी बाजार समिती सभापतींना याबाबत तात्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
पंचवटीतील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात झालेली गर्दी आणि दुकाने सुरू असल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती. या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत सभापती देविदास पिंगळे यांना विचारणा करून गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तातडीने उपायेाजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या. गर्दी नियंत्रणात आली नाही तर कोरेाना संपेपर्यंत बाजार समिती बंद करण्याची कारवाई केली जाईल असा इशाराही दिला होता.
गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी पोलीस आणि मनपा प्रशासनाकडून प्रयत्न केले जात असून दुकाने उघडी दिसल्यास् दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे. बाजार समितीने आपल्या स्तरावर देखील योग्य ती कार्यवाही करावी असे जिल्हाधिकाऱ्यांनी कळविले होते.
दरम्यान, फूड जॉइंटस्, मिठाईची दुकाने यांना केवळ पार्सल देता येणार आहे. त्याठिकाणी उभे राहून खाण्यास मनाई करण्यात आलेली आहे. याबाबतचे पालन करण्याची जबाबदारी संबंधित व्यावसायिकांची असून अशा ठिकाणी गर्दी दिसून आल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा देखील जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
--कोट--
तर आास्थापना सील
निर्बंध नियमांचे उल्लंघन केल्यास यापुढे दंडाबरोबरच संबंधित आस्थापना शासनाच्या अधिसूचनेप्रमाणे कोरोना जाईपर्यंत सील केल्या जातील याची संबंधितांनी नोंद घ्यावी
- सूरज मांढरे, जिल्हाधिकारी.