...तर सोमवारपासून व्यापारी दुकाने सुरू करणार, चेंबरच्या बैठकीत निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:15 AM2021-04-11T04:15:14+5:302021-04-11T04:15:14+5:30
राज्य शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ अंंतर्गत संभाव्य निर्णयाबाबत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने व्यापाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेण्यात आली. यात ...
राज्य शासनाच्या ‘ब्रेक द चेन’ अंंतर्गत संभाव्य निर्णयाबाबत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या वतीने व्यापाऱ्यांची ऑनलाइन बैठक घेण्यात आली. यात हा निर्णय घेण्यात आला, तसेच छोट्या व्यापाऱ्यांना आर्थिक पॅकेजची मागणी करण्याचा निर्णयही व्यापारी संघटनांच्या बैठकीत झाल्याचे महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष संतोष मंडलेचा व वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी सांगितले.
यावेळी व्यापाऱ्यांनी शासनाच्या संभाव्य निर्णय आणि अंमलबजावणीच्या आधारे मते मांडली. त्यानंतर, हा निर्णय घेतला. बैठकीस कैलास खंडलेवाल, विलास शिरोरे, शुभांगी तिरोडकर, अनिलकुमार लोढा, संजय दादलीका, विनोद कलंत्री, संजय शेटे, राजू राठी, फतेचंद राका, प्रफुल्ल मालाणी , राजेश शहा, रवी चन्नावार , गिरीश नवसे, हसमुखभाई पटेल यांच्यासह अन्य व्यापारी सहभागी झाले होते.