.... म्हणून होतात चक्कर येऊन आकस्मात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:16 AM2021-05-06T04:16:36+5:302021-05-06T04:16:36+5:30

नाशिक- शहरात मध्यंतरी अनेकांना केवळ चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. मात्र त्यामागे वैद्यकीय कारणे असल्याचे ...

.... so they become dizzy and die suddenly | .... म्हणून होतात चक्कर येऊन आकस्मात मृत्यू

.... म्हणून होतात चक्कर येऊन आकस्मात मृत्यू

googlenewsNext

नाशिक- शहरात मध्यंतरी अनेकांना केवळ चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. मात्र त्यामागे वैद्यकीय कारणे असल्याचे स्पष्टीकरण महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्पना कुटे यांनी दिले आहे. रक्तातील प्राणवायूचे प्रमाण कमी झाल्यामुळे ‘हायपॉक्सिया’ तसेच उभ्या उभ्या काम केल्यामुळे ‘हायपोटेन्शन’ यामुळे रुग्ण अकस्मात धक्का बसून जागीच कोसळू शकतो आणि त्यामुळे त्याच्या प्राणावर बेतू शकते असे मतही डॉ. कुटे यांनी व्यक्त केले.

नाशिकमध्ये कोरोना बाधितांची संख्या वाढत असतानाच शहरात एकेका दिवसात नऊ तर कधी अकरा जण चक्कर येऊन मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणा चक्रावली होती. कोरोना संसगामुळे गंभीर स्थिती आहे. त्यामुळे हा कोराेनाचा नवा स्टेंट आहे काय अशी शंका घेतली जात होती. यासंदर्भात स्पष्टीकरण देताना डॉ. कुटे यांनी म्हटले आहे की, साधारणत: चाळीस वर्षे वयानंतर रक्त वाहिन्यांची लवचिकता कमी होत असते. विशेषत: बदललेली जीवनशैली तसेच अनुवंशिकता किंवा जेनेस्टीक स्ट्ररमधील बदल हे त्यासाठी कारण ठरू शकते. सामान्यपणे तीस ते पन्नास या वयोगटात रक्तवाहिन्यांची लवचिकता कमी झाल्याने गुठळी हाेऊन हृदयक्रिया बंद पडू शकते आणि त्यामुळे मृत्यू होऊ शकतात. युवावस्थेत असल्याने शरीरातील घडामोडींची वैद्यकीय तपासणी केली जात नाही. तसेच दैनंदिन कामकाजाच्या तणावात तर ते लक्षात येत नाही. रक्तातील प्राणवायू म्हणजेच ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला की, हायपोक्सिया आणि सतत उभे राहून काम केल्याने हायपोटेन्शन यामुळे तरूणांना धक्का बसतो आणि ते खाली कोसळून दगावू शकतात असे कुटे यांनी म्हटले आहे.

एखाद्या व्यक्तीच्या रक्तवाहिनीत अथवा शरीराच्या ज्या अवयवात गठुळी अडकते, त्या भागाला ती हानीकारक ठरते. त्यातूनच हृदयविकाराचा झटका येतो. किंवा मेंदूत अडकल्यास पक्षघाताचा झटका देखील येऊ शकतो, असेही डॉ. कुटे यांनी नमूद केले आहे. कमी वयातील मुलांत केशवाहिन्यांचे जाळे तयार न झाल्यामुळे अकाली मृत्यू होत आहेत. कोरोना पश्चात संसर्गात सहा महिन्यांनी हे प्रमाण दिसत आहे., यावर त्यांनी चिंचा व्यक्त केली आहे. अशा प्रकारचा धोका टाळण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांकडून रक्त पातळ होण्यासाठीचे आवश्यक इंजेक्शन अथवा गोळ्या, त्यांच्या सल्ल्याने अथवा देखरेखीखाली घेणे अत्यंत आवश्यक आहे, असेही कुटे यांनी नमूद केले आहे.

Web Title: .... so they become dizzy and die suddenly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.