... तर सरकारला सहकार्य करणार नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:14 AM2021-05-27T04:14:12+5:302021-05-27T04:14:12+5:30
सिटू भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना डॉ.कराड यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या बारा दिवसाच्या लॉकडाऊन काळातील ...
सिटू भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलतांना डॉ.कराड यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाने लागू केलेल्या बारा दिवसाच्या लॉकडाऊन काळातील वेतन देण्यास अनेक उद्योग तयार नाहीत. जिल्हाधिकाऱ्यांनी अशा उद्योगांना पूर्ण वेतन देण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी केली आहे. दुसऱ्या लाटेत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनावरील उपचारासाठी लोकांना कर्जबाजारी व्हावे लागले आहे. दिवाळे निघाले आहे.अनेक कुटुंब रस्त्यावर आले आहेत. म्हणून सर्वांचा मग तो कामगार असो वा व्यावसायिक ५० लाख रुपयांचे विम्याचे सुरक्षा कवच मिळाले पाहिजे. दुसऱ्या लाटेत सरकारला संपूर्ण सहकार्य केले आहे. मात्र तिसऱ्या लाटेसाठी सरकारने पूर्वतयारी करणे गरजेचे आहे. एक रुपयाही खर्च न करता वैद्यकीय सेवा मिळाली पाहिजे. अन्यथा मंत्र्यांना रस्त्यावर फिरू दिले जाणार नाही. कोणतेही सहकार्य केले जाणार नाही, असा इशारा दिला आहे. प्राप्तीकर लागू नसलेल्या नागरिकांच्या खात्यावर ७५०० रुपये जमा करावेत. केरळ सरकारच्या धरतीवर लॉकडाऊनच्या काळातील सर्व नागरिकांचे वीजबिल, पाणीबिल माफ करण्यात यावे. सातपूर, अंबड, सिन्नर माळेगाव, मुसळगाव, दिंडोरी, पिंपळगाव औद्योगिक वसाहतीत प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करून कामगारांचे मोफत लसीकरण करण्यात यावे, अशीही मागणी त्यांनी केली आहे. यावेळी सीताराम ठोंबरे, कल्पना शिंदे, तुकाराम सोनजे, संतोष काकडे, मोहन जाधव आदी उपस्थित होते.