दूरध्वनी विभागाला सोसेना ‘स्वेच्छानिवृत्तीचा’ भार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 11:41 PM2020-02-27T23:41:12+5:302020-02-27T23:46:48+5:30
मालेगाव : उपविभागीय भारत दूरसंचार निगमच्या कार्यालयातील ५६ पैकी तब्बल ४९ अधिकारी-कर्मचाºयांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने आणि दोन जण सेवानिवृत्त होत असल्याने अवघ्या पाच जणांना दूरसंचार निगमचा भार सोसावा लागत आहे. त्यांच्यावर कामाचा व्याप वाढला असून, शासनातर्फे भरण्यात येणाºया कंत्राटी कामगारांच्या नियुक्तीकडे काम करणाºया दूरध्वनी विभागाच्या कर्मचाºयांचे लक्ष लागून आहे.
शफीक शेख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगाव : उपविभागीय भारत दूरसंचार निगमच्या कार्यालयातील ५६ पैकी तब्बल ४९ अधिकारी-कर्मचाºयांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने आणि दोन जण सेवानिवृत्त होत असल्याने अवघ्या पाच जणांना दूरसंचार निगमचा भार सोसावा लागत आहे. त्यांच्यावर कामाचा व्याप वाढला असून, शासनातर्फे भरण्यात येणाºया कंत्राटी कामगारांच्या नियुक्तीकडे काम करणाºया दूरध्वनी विभागाच्या कर्मचाºयांचे लक्ष लागून आहे.
मालेगाव उपविभागीय भारत दूरसंचार निगम कार्यालयात एकूण ५६ अधिकारी, कर्मचारी होते. मालेगाव उपविभागात सटाणा, नांदगाव, मनमाड, चांदवड आणि येवला अशा सहा तालुक्यांचे दूरध्वनी विभागाचे काम सुरू आहे. एकट्या मालेगाव कार्यालयातून मोठ्या संख्येने कर्मचाºयांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आहे, मात्र त्यातील अनेक कर्मचारी आजही दूरसंचार निगम कार्यालयात फावल्या वेळेत चकरा मारून आपल्या अधिकाºयांना सेवा देत असल्याचे चित्र मालेगाव कार्यालयात दिसून आले.
सध्या उरलेल्या कर्मचाºयांवर कामाचा बोजा वाढल्याने सायंकाळी
५ वाजेपर्यंत काम करणारे कर्मचारी आता उशिरापर्यंत काम करीत आहेत. भ्रमणध्वनी विभागाचे सीमकार्ड देणे, पेमेंट घेणे याची कामे कंत्राटी कामगार करीत आहेत. मात्र पार्ट पेमेंट, धनादेश घेणे, एफटीटीएसची कामे भारत दूरसंचार निगमचे अधिकृत कर्मचारी करीत आहेत. नवनियुक्त उपविभागीय अभियंता (डीईटी) गांगुर्डे यांना मालेगावखेरीज सटाणा, नांदगाव, मनमाड, चांदवड व येवला या तालुक्यांचे काम सांभाळावे लागत असल्याने आठवड्यातून एक ते दोन दिवस ते मालेगावी थांबत आहेत. जग झपाट्याने बदलत असताना दूरध्वनी विभागानेही आपली सेवा स्पर्धकांप्रमाणे द्यावी, अशी अपेक्षा ग्राहकांकडून व्यक्त होत आहे.कारभार ‘सुरळीत’ असल्याचा दावा जुन्या अनेक दिवसांपासून काम करणाºया अधिकारी-कर्मचाºयांना मालेगाव शहरासह परिसरातील दूरध्वनी विभागाची केबलची माहिती होती. नवीन अधिकाºयांना त्याबाबत माहिती नसल्याने त्यांचे हाल होत आहेत. परिणामी त्यांना जुन्या कर्मचाºयांना बोलावून माहिती घ्यावी लागत आहे. उपविभागीय अभियंता (डीईटी) कदम यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्याने त्यांच्या जागेवर के. डी. गांगुर्डे यांनी पदभार स्वीकारला आहे. आठ जणांमधून पाच तांत्रिक कर्मचारी असून, तीन लिपिक आहेत. त्यातील तीनही लिपिक मे २०२० पर्यंत सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळे मालेगाव कार्यालयात केवळ पाच अधिकारी, कर्मचारी उरतात. मार्च महिन्यात कंत्राटी तांत्रिक कर्मचारी भरले जाणार आहेत. असे असले तरी संबंधित दूरध्वनी विभागाच्या अधिकाºयांनी आपला कारभार ‘सुरळीत’ असल्याचा दावा केला आहे.