करिअर घडविताना सामाजिक जाणीवही जपावी : ई. वायुनंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2019 11:39 PM2019-02-24T23:39:35+5:302019-02-25T00:14:18+5:30
विकासाच्या अनेक संधी आता विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. परंतु विद्यार्थ्यांनी आपले करिअर केवळ आर्थिक निकषांवर न मोजता कुटुंब, समाज आणि देशाशी असलेली बांधिलकी तसेच नीतिमूल्यांची शिकवणही लक्षात ठेवून करिअर घडवितांना सामाजिक जाणीवही जपावी,
नाशिक : विकासाच्या अनेक संधी आता विद्यार्थ्यांना उपलब्ध आहेत. परंतु विद्यार्थ्यांनी आपले करिअर केवळ आर्थिक निकषांवर न मोजता कुटुंब, समाज आणि देशाशी असलेली बांधिलकी तसेच नीतिमूल्यांची शिकवणही लक्षात ठेवून करिअर घडवितांना सामाजिक जाणीवही जपावी, पदवीधरांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग समाजासाठी व देशसेवेसाठी करावा, असे प्रतिपादन यशंवतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी केले.
भोसला सैनिकी महाविद्यालयात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या चतुर्थ पदवीग्रहण सोहळ्यात ते बोलत होते. याप्रसंगी सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे सरकार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, नाशिक विभागाचे कार्यवाह हेमंत देशपांडे, पी. जे. इखणकर, डॉ. व्ही. व्ही. राजे उपस्थित होते. प्रारंभी दीपप्रज्वलन करण्यात झाल्यानंतर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. त्यानंतर विविध विद्याशाखांच्या ७८ विद्यार्थ्यांना प्रदान करण्यात आली. प्राचार्य डॉ. उन्मेश कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन मुग्धा जोशी यांनी केले. डॉ. व्ही. व्ही. राजे यांनी आभार मानले.