मायलेकी संस्थेने जपली सामाजिक बांधिलकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:16 AM2021-04-28T04:16:16+5:302021-04-28T04:16:16+5:30
या जीवघेण्या आजाराची साखळी तोडण्यासाठी सरकारने येत्या ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ...
या जीवघेण्या आजाराची साखळी तोडण्यासाठी सरकारने येत्या ३० एप्रिलपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते ११ या दरम्यानच सुरु ठेवण्यास परवानगी आहे. दरम्यान, संचारबंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी व्हावी म्हणून शहरात ठिकठिकाणी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. वाहने तपासूनच प्रवेश दिला जात असून, ही जबाबदारी पोलीस कर्मचारी पार पडत आहेत. चोवीस तास खडा पहारा देणाऱ्या या कर्मचाऱ्यांच्या खाण्यापिण्याचे काय, असा प्रश्न सगळ्यांनाच पडत असला तरी मदतीचे हात मात्र मोजकेच असतात. सिडकोतील मायलेकी सामाजिक बहुउद्देशीय संस्थेने जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांना पिण्याचे पाणी, खाद्यान्न पुरवून सामाजिक बांधिलकी जपली आहे. संस्थेच्या अध्यक्ष भारती अहिरे, सचिव नलिनी पाटील, खजिनदार सविता खैरनार, हिरालाल चिडियाल यांचे सहकारी शहरातील प्रत्येक चेक नाक्यावर जाऊन पोलीस कर्मचाऱ्यांची क्षुधाशांती करण्याचा प्रयत्न करीत आहेत.