पांगरीत सोशल डिस्टन्सिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2020 11:28 PM2020-04-01T23:28:47+5:302020-04-01T23:29:53+5:30
पांगरी येथे कोरोनासंदर्भात आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीकडून जनजागृती केली जात आहे. मेडिकल, किराना, रेशन दुकान इत्याद िठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा वापर केला जाऊ लागला आहे. मात्र भाजीबाजारात गोंधळ झाल्याचे दिसून आले.
पांगरी : पांगरी येथे कोरोनासंदर्भात आरोग्य विभाग आणि ग्रामपंचायतीकडून जनजागृती केली जात आहे.
मेडिकल, किराना, रेशन दुकान इत्याद िठिकाणी सोशल डिस्टंसिंगचा वापर केला जाऊ लागला आहे. मात्र भाजीबाजारात गोंधळ झाल्याचे दिसून आले. स्थानिक शेतकरी थोडेच असल्याने सर्वजण सहा ते सात फूट अंतर ठेवून बसले होते. परंतु नंतर बाहेरील व्यापारी मोठ्या प्रमाणावर आल्याने बाजारात एकच गोंधळ उडाला. येथील स्थानिक कार्यकर्ते प्रकाश पांगारकर, चंद्रभान दळवी, दशरथ पगार, संतोष पगार आदींनी व्यापाऱ्यांना दूर बसण्यास सांगितले तसेच संसर्ग होऊ नये याची खबरदारी घेण्याचे आवाहन केले. परंतु एकही व्यापारी ऐकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने पोलिसांनी सदरचा बाजार उठविला. बीट हवालदार संदीप शिंदे आणि सहकाऱ्यांनी तत्काळ विक्र ेत्यांना विक्री बंद करुन घरी जाण्यास सांगितले. अगदी दहा मिनिटांत राममंदिर परिसर मोकळा करण्यात आला.
निर्जंतुकीकरणाचे औषध फवारणी पंप असलेला बोअर ट्रॅक्टर उद्घाटन सरपंच पांगारकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी संदीप पगार, समशेर कादरी, प्रकाश पांगारकर, धनु निरगुडे, संतोष पगार आदी उपस्थित होते. संपूर्ण गावात औषध फवारणी करण्यात आल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.
मुंबई, पुणे आदी ठिकाणांहून सुमारे २२०० नागरिक दाखल झाले आहेत. तसेच फळ-भाजी विक्र ेते काळजी घेताना दिसत नसल्याने बाहेरील विक्र ेतांना गावात बंदी करण्यात आली आहे. बाहेरील विक्रेता गावात आल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
-ज्ञानेश्वर पांगारकर, सरपंच