सोशल मीडियाद्वारे तरुणाशी ओळख वाढविणे पडले महागात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2017 10:44 PM2017-09-16T22:44:15+5:302017-09-16T22:44:23+5:30

Social media has increased the identity of the young man ... | सोशल मीडियाद्वारे तरुणाशी ओळख वाढविणे पडले महागात...

सोशल मीडियाद्वारे तरुणाशी ओळख वाढविणे पडले महागात...

Next

नाशिक : विवाहित महिलेला सोशल मीडियाद्वारे तरुणाशी ओळख वाढविणे चांगलेच महागात पडले आहे.या तरुणाने केलेले चॅटिंग महिलेच्या पतीस दाखविण्याची धमकी देत घर गाठून तिचा विनयभंग केल्याची घटना नाशिकरोड परिसरात घडली आहे़ याप्रकरणी संशयित महेंद्र नागरे (मु़ पो़ राहाता, जि़ अहमदनगर) याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकरोड परिसरातील एका २६ वर्षीय विवाहितेसोबत संशयित नागरे याने सहा महिन्यांपासून सोशल मीडियातील व्हॉट्सअ‍ॅपद्वारे चॅटिंग करून ओळख निर्माण केली़ त्यांच्यामध्ये चॅटिंगद्वारे अश्लील संदेशांचीही देवाण-घेवाण झाली़ यानंतर हे संदेश पतीस दाखविण्याची धमकी देत विवाहितेच्या घरी पोहोचून तिचा विनयभंग केला़ तसेच सोशल मीडियावरील अश्लील व्हिडीओ कॉलिंग करण्यास भाग पाडले़
या प्रकरणी पीडित विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिकरोड पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Social media has increased the identity of the young man ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.