राष्टवादीने दिले युवकांना सोशल मीडियाचे धडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2018 12:16 AM2018-03-25T00:16:42+5:302018-03-25T00:16:42+5:30
आगामी काळात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सोशल माध्यमाचा वापर करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेसने युवकांना सोशल मीडियाचा वापर व त्याची माहिती देण्यास सुरुवात केली असून, त्याचाच भाग म्हणून शनिवारी राष्टÑवादी युवक कॉँग्रेसने सोशल मीडिया शिबिर भरवून सुरुवात केली आहे.
नाशिक : आगामी काळात सत्ताधाऱ्यांच्या विरोधात सोशल माध्यमाचा वापर करून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी राष्टÑवादी कॉँग्रेसने युवकांना सोशल मीडियाचा वापर व त्याची माहिती देण्यास सुरुवात केली असून, त्याचाच भाग म्हणून शनिवारी राष्टÑवादी युवक कॉँग्रेसने सोशल मीडिया शिबिर भरवून सुरुवात केली आहे. राष्टÑवादी भवन येथे यावेळी पाचशे युवकांचे फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अकाउंट उघडून देण्यात आले. राजकीय व सामाजिक विषयावर गप्पा मारत रोज वापरणाºया फेसबुक, ट्वीटर, इंस्टाग्राम सांरख्या प्रभावी माध्यमांचा छोटे-मोठे बारकावे लक्षात घेऊन परिपूर्ण उपयोग जाणून घेण्यासाठी सोशल मीडिया शिबिर आयोजित करण्यात आले होते, या शिबिराला सॉफ्टवेअर इंजिनियर योगेश फुंदे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी नाशिक जिल्हा निरीक्षक विशाल काळभोर, शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार, नाशिक योगेश निसाळ, अॅड. चिन्मय गाढे, कैलास मोरे, शिवराज ओबेरॉय, रोहन नहिरे, नवराज रामराजे, विशाल कोशिरे, डॉ. संदीप चव्हाण, रेहान शेख, विशाल तायडे, सागर बेदरकर, नीलेश कर्डक, रवींद्र पूरकर, राजेश पाटील, संतोष भुजबळ, सचिन बिडकर, भूषण गायकवाड, मनोज चव्हाण, प्रवीण साळुंके, सुरगाणा अध्यक्ष राजू पवार, राहुल तुपे, सिद्धार्थ गायकवाड, मनीष भागडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
विकासकामे पोहचविणार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे व विचार सामान्य जनतेपर्यंत पोहचवण्यासाठी या सोशल मीडिया शिबिराचे आयोजन राष्टÑवादी युवक कॉँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे व जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम कडलग यांनी केले होते. पक्षाने केलेली विकासकामे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा सर्वांत सोपा आणि कोणालाही जमेल, असा अत्यंत प्रभावी मार्ग सोशल मीडिया हा आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या प्रेरणेतून तसेच युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम दादा कोते यांच्या मार्गदर्शनाखाली या सोशल मीडिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.